शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेचा अपहरणाचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:14 IST

जळगाव रोडवरील एसबीओए शाळेच्या आवारातून साडेतीनवर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न सतर्क रिक्षाचालकामुळे फसला. हा प्रकार लक्षात आल्याने पालक आणि रिक्षाचालकाने आरडाओरड करून आरोपीला पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जळगाव रोडवरील एसबीओए शाळेच्या आवारातून साडेतीनवर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न सतर्क रिक्षाचालकामुळे फसला. हा प्रकार लक्षात आल्याने पालक आणि रिक्षाचालकाने आरडाओरड करून आरोपीला पकडले. गस्तीवरील हर्सूल ठाण्याच्या चार्ली पोलिसांनी तात्काळ आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली.सिडको पोलिसांनी सांगितले की, जळगाव रोडवरील एसबीओए शाळेत सिडको एन-६ येथील एका बँक कर्मचाºयाची मुलगी बालवर्गात आहे. या बालिकेची शाळेत ने-आण करण्यासाठी त्यांनी रिक्षा लावली आहे. नेहमीप्रमाणे चिमुकलीस आणण्यासाठी रिक्षाचालक गुरुवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर थांबला होता. यावेळी २२ ते २४ वर्षांचा तरुण तेथे अचानक आला आणि त्याने पाठीमागून चिमुकलीस उचलले. हे रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्याकडून चिमुकलीस अक्षरश: हिसकावून घेतले. ते त्याच्यावर जोरात ओरडल्याने अन्य पालक आणि रिक्षाचालकांच्या हा प्रकार लक्षात आला. चोहोबाजूंनी लोकांनी घेरल्याने त्यास पळून जाता आले नाही. लोकांनी पकडून त्यास चोप दिला. लोकांच्या आवाजाने तेथून जात असलेले गस्तीवरील हर्सूल ठाण्याचे हवालदार किरण काळे आणि कर्मचारी शाळेत गेले. त्यांनी आरोपीला लोकांच्या तावडीतून ताब्यात घेतले आणि सिडको ठाण्यात नेले. रिक्षाचालकाने चिमुकलीच्या पालकांना या घटनेची माहिती देत त्यांना सिडको ठाण्यात बोलावून घेतले.तो तर मनोरुग्ण वाटतो...सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती म्हणाले की, पोलिसांनी त्या तरुणाची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक आधार कार्ड मिळाले. या आधार कार्डनुसार त्याचे नाव जितेंद्र आणि तो मध्य प्रदेशातील धार येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचे जाणवले. त्याला मात्र त्याचे नीट नाव आणि त्याचा पत्ता सांगता येत नाही. त्यास सोबत घेऊन पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची ही अवस्था पाहून बालिकेच्या पालकांनीही त्याच्याविरुद्ध तक्रार दिली नाही.