शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या साक्षीवरून संशयी बापाला जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: July 11, 2014 01:05 IST

औरंगाबाद : पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून जाळून मारणाऱ्या वडिलांना १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलाच्या साक्षीमुळे जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली गेली.

औरंगाबाद : पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून जाळून मारणाऱ्या वडिलांना १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलाच्या साक्षीमुळे जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली गेली. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. कचरे यांनी हा निकाल दिला. विष्णू आसाराम कानडे हा पत्नी वैशाली (२८, रा. सम्राटनगर, सातारा परिसर) हिच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. त्यावरून त्यांच्यात वादही होत. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी विष्णू कानडे कामाला जातो असे सांगून घरून निघाला; परंतु कामाला न जाता तो घरी आला. यावेळी त्याने दोन्ही मुलांसमोर वैशालीशी भांडण केले व तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. गंभीर भाजलेल्या वैशालीला विष्णूने घाटी रुग्णालयात दाखल केले.अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. युसूफ मणियार यांना वैशालीने दिलेल्या जबाबात पतीने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचे सांगितले. सातारा पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. त्यातही तिने पतीने रॉकेल टाकून जाळल्याचे सांगितले होते. २३ फेब्रुवारी रोजी उपचार सुरू असताना वैशालीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू कानडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक बी.के. कंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.डी. काचेमल यांनी तपास केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी लोकअभियोक्ता एस.एम. रझवी यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात वैशालीचा मुलगा आणि मुलीची, डॉ. मणियार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने विष्णू कानडेला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच भा.दं.वि. कलम ४९८ अ नुसार त्याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला अ‍ॅड. एस.व्ही. पंडित आणि अ‍ॅड. एच.व्ही. तुंगार यांनी साहाय्य केले.चारित्र्याच्या संशयावरून घेतला पत्नीचा बळीविष्णू आसाराम कानडे हा पत्नी वैशालीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी विष्णूने विशाल (१०) आणि कल्पना (१२) (दोघांचीही नावे बदलेली) यांच्यासमक्ष वैशालीला जाळले.