शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

शिशू कल्याण योजनेला घरघर

By admin | Updated: September 4, 2014 00:20 IST

गंगाधर तोगरे, कंधार सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यक्रम शासनाने राबविला.

गंगाधर तोगरे, कंधारसुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यक्रम शासनाने राबविला. रुग्णांना वाहन सेवा व भोजन मोफत पुरविले जाते. परंतु योजनेला निधीअभावी घरघर लागली आहे. वाहनासाठीचा डिझेल खर्च तात्पुरता रुग्ण, नातेवाईकांना पदरमोड करावा लागत आहे. तर भोजन उधारीवर भागवावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मात्र पळता भूई होतानाचे चित्र आहे.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत नागरिकांना विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी विविध प्र्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य योजनेतून भक्कम होत असल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. केंद्र व राज्य शासनाने आरोग्य सुविधेत मोठी वाढ केली आहे. जोखिमेची प्रसूती सुरक्षित करण्यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यान्वित करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय व पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रसूतीसाठी महिलांना घेऊन जाणे व पुन्हा घरी आणून सोडणे मोफत सेवा दिली जाते. परंतु आता एक ते सव्वा महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयात निधी उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातही अन्य बाबीतून डिझेल खर्च करण्याचा प्रसंग आला आहे.शहरातील ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. तज्ञांचा अभाव व स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाणवा हा सतत चिंतेचा विषय झाला आहे. अस्थायी, आयुष, मानद डॉक्टरावर रुग्णसेवेचा भार आहे. त्यातच जे. एस. एस. एस. के. ची भर पडली आहे. नातेवाईक, रुग्णांनी १०२ क्रमांकाला कॉल केल्यास तत्काळ वाहन पाठवले जाते. प्रसूतीसाठीची संदर्भ वाहन सेवा पुरविणे अनिवार्य आहे. मोफत वाहन सेवा असून सुखरुप प्रसूती होणे या सेवेत अभिप्रेत आहे.रुग्णास ग्रामीण रुग्णालय नांदेडचे शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल केले जाते. प्रवासासाठी ये-जा करणे वाहनसेवा मोफत आहे. परंतु एक ते सव्वा महिन्यांपासून निधी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांना डिझेल पुरविण्याचा, खर्च करण्याचा प्रसंग समोर आला आहे. जवळपास ४० जणांनी पदरमोड केल्याचे समजते. निधी आल्यानंतर रुग्णांचे पैसे परत केले जाणार असल्याचे ग्रामीण रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यातच भोजन हे शहरातील एका उपाहारगृहातून उधारीवर घेतले जात आहे. रुग्ण-नातेवाईकांच्या शंकाचे निरसन करण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची पळता भूई थोडी होत असल्याचे चित्र आहे. १०२ क्रमांकाप्रमाणेच बारुळ व कुरुळासाठी १०८ क्रमांक संदर्भसेवेचे वाहन उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहनातून रुग्णास कंधार, नांदेड व मुखेड येथे सोयीच्या ठिकाणी घेऊन जातात. ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्ण घेऊन जाण्याचा, दाखल करण्याचा कल अधिक आहे. अतिशय जोखीमेचा रुग्ण नांदेडला पाठविण्याचे प्रमाण शहरातून अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयाची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र आहे. निधी तत्काळ उपलब्ध करुन देवून रुग्णांना दिलासा देण्याची मागणी होत आहे़