शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

स्लायडिंग गेट अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : चार दिवस राहण्यासाठी औरंगाबादेतील चुलत्याच्या घरी आलेल्या सहा वर्षीय बालकाच्या अंगावर अंगणातील स्लायडिंग गेट पडल्याने झालेल्या ...

औरंगाबाद : चार दिवस राहण्यासाठी औरंगाबादेतील चुलत्याच्या घरी आलेल्या सहा वर्षीय बालकाच्या अंगावर अंगणातील स्लायडिंग गेट पडल्याने झालेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना सातारा परिसरातील विजयंतनगर येथे १५ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास झाली. मयूर भुजंग भांडे (६, रा. मोहजा इंगोले, जि. वाशिम), असे मृत बालकाचे नाव आहे.

मयूरचे चुलते मल्हारी भांडे हे सातारा परिसरातील विजयंतनगर येथे राहतात. चार ते पाच दिवसांपूर्वी मल्हारी हे गावी गेले होते. तेव्हा त्यांनी त्याला औरंगाबादला आणले होते. गुरुवारी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास मयूर घराच्या कम्पाऊंडवॉलला असलेल्या लोखंडी स्लायडिंग गेटवर खेळत होता. यावेळी अचानक हे वजनदार गेट स्लायडिंगमधून निसटले आणि मयूरच्या अंगावर पडले. गेट पडल्याच्या आवाजाने नातेवाईक धावले. गेटखाली दबलेल्या मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध पडल्याचे पाहून मल्हारी यांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी मयूर यास तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार बी.सी. राठोड हे घटनेचा तपास करीत आहेत. मयूरला एक मोठा भाऊ असून त्याचे वडील गावी शेती करतात, असे पोलिसांनी सांगितले. मयूरचे शवविच्छेदन झाल्याने नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे पार्थिव गावी नेले.