शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चावडी वाचन झाले, सातबारा दुरुस्ती नाही

By admin | Updated: July 15, 2017 23:53 IST

हिंगोली : जिल्ह्यात सातबारा दुरुस्तीचे काम केवळ दीड टक्का शिल्लक असले तरीही पीक पाहणीचा कॉलमच नसल्याची बोंब आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सातबारा दुरुस्तीचे काम केवळ दीड टक्का शिल्लक असले तरीही पीक पाहणीचा कॉलमच नसल्याची बोंब आहे. शिवाय चावडी वाचनात २५ हजारांच्या आसपास तक्रारी आल्या होत्या. त्यांचा निपटारा हस्तलिखितांशिवाय करणे शक्य नसल्याने ही वेगळी समस्याही आ वासून उभी आहे. जिल्ह्यात एकूण १.८0 लाख सातबारा आहेत. यात हिंगोली ४00३0, औंढा-२७५५४, कळमनुरी-३६४३४, वसमत-३६४२६, सेनगाव-४0१६४ अशी तालुकानिहाय संख्या आहे. त्यापैकी बंद झालेल्यांची संख्या १५३ एवढी आहे. तर दुरुस्तीची गरज न पडता कन्फर्म झालेल्या सातबारांची संख्या यात हिंगोली-२0२७१, औंढा-८१७६, कळमनुरी-१४७४१, वसमत-१२0७६, सेनगाव-१0३३0 अशी संख्या आहे. तर १.१३ लाख सातबारा या दुरुस्त कराव्या लागणार होत्या. त्यापैकी बहुतांश तक्रारी निकाली काढल्याचे सांगितले जात असले तरीही चावडीवाचनानंतर पुन्हा २५ हजारांच्या आसपास तक्रारी आल्या आहेत. त्यातच सातबारा दुरुस्ती करणारे सॉफ्टवेअरही अर्धवटच माहिती घेते. त्यात पीक पाहणीचा महसूल प्रशासनासाठीचा महत्त्वाचा असणारा कॉलमच नाही. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत सातबारा दुरुस्ती करून संगणकीकृत कामकाज सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. एकीकडे शासन मात्र संगणकीकृत सातबाराचाच वापर विविध योजनांसाठी करण्याचा हेका लावून बसले असताना दुसरीकडे ही परिस्थिती आहे.डेडलाईन नावालाचचावडी वाचन झाल्यानंतर आलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेत करणेच शक्य नाही. त्यातील अनेक तक्रारी रास्त असणार आहेत. सातबारातील चुका, नावातील दुरुस्ती, फेर योग्य लागला नाही, अशा तक्रारींचा पूर्णपणे निपटारा होईपर्यंत सातबारा अद्ययावत होणे शक्य नसल्याने ही डेडलाईन नावालाच उरण्याची शक्यता आहे. पीक पाहणीचा कॉलम तर अजूनही अडचणीचा ठरणार आहे. त्यात काही ठिकाणी कुळाची नावेही दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने मात्र हे काम गतिमान करण्यासाठी तलाठ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. अनेक तलाठी यामुळे अडचणीत येण्याचीही शक्यता आहे.