खुलताबाद नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, सहायक ग्रंथपाल लेखापालाचे काम करतात, तर सफाई मजूर हा ट्रॅक्टर घंटागाडी चालवतो. एकंदरीत न.प.चा कारभार प्रभारीवर सुरू आहे.नगर परिषदेत ६७ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ५३ कर्मचारी कार्यरत असून, जवळपास १४ पदे रिक्त आहेत. यात कार्यालयीन अधीक्षक कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, लेखापाल, फिटर आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने ही कामे इतर कर्मचारी करीत आहेत. यामध्ये सहायक ग्रंथपाल हे लेखापाल म्हणून कारभार पाहतात, तर सफाई मजूर हा न.प.ची घंटागाडी चालवतो. वॉलमन फिटरचे काम करतो. वॉलमनचे काम सफाई मजूरच करीत आहे. शहरातील विद्युत लाईट लावण्याचे कामही सफाई मजूरच करीत आहे. नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांची पदे भरावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खुलताबादमध्ये ‘प्रभारीराज’
By admin | Updated: August 6, 2014 02:37 IST