शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘गीता’चाही अध्याय संपला

By admin | Updated: June 25, 2016 00:45 IST

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात मागील २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारी पांढरी वाघीण ‘गीता’हिने शुक्रवारी सकाळी शेवटचा श्वास घेतला

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात मागील २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारी पांढरी वाघीण ‘गीता’हिने शुक्रवारी सकाळी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या १८ व्या वर्षी गीताच्या विविध अवयवांनी साथ देणे सोडून दिले होते. श्वसनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाची गती मंदावली होती. तिच्या मृत्यूने प्राणि संग्रहालयातील एक पिंजरा पुन्हा एकदा सुनासुना झाला. प्राणिसंग्रहालयात पांढऱ्या वाघांची आता एकच जोडी शिल्लक राहिली आहे.मनपाने ओरिसाच्या नंदन कानन येथील प्राणिसंग्रहालयातून भानुप्रिया आणि प्रमोद या जोडीला आणले होते. या जोडीने तब्बल नऊ पिलांना जन्म दिला. १८ जानेवारी १९९८ मध्ये त्यांनी गीताला जन्म दिला. जन्मापासून गीता उद्यानातच खेळत बागडत आहे. तिच्या भाऊ, बहिणींना देशभरातील इतर उद्यानांमध्ये पाठविण्यात आले. मात्र, गीता कुठेच गेली नाही. प्राणिसंग्रहालयात दररोज तिची विशेष काळजी घेण्यात येत होती. केअरटेकर झिया, काळे आणि संजय नंदन यांच्याशी तिची जाम गट्टी होती. त्यांच्या एका आवाजावर ती कोठूनही पळत येत असे. ४ जून रोजी गीता अचानक आजारी पडली. तिच्या आजारपणाचे कारण शोधून काढण्यात आले. रक्ताच्या तपासण्यांचा अहवाल पाहून उद्यानातील डॉक्टरांनाही धक्का बसला. गीताची श्वसनसंस्था, यकृत, मूत्रपिंड काम करीत नसल्याचे निदर्शनास आले. किडनीजवळ ट्युमरची गाठ झाली होती. डॉ. खाजा इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्या दिवसापासून गीतावर औषधोपचार सुरू ठेवले. सुरुवातीला औषधोपचाराला ती प्रतिसादही देत होती. गुरुवारी सायंकाळी तिची प्रकृती अधिक खालावली. गीताने पंधरा दिवसांनंतर थोडेसे जेवणही सायंकाळी केले. केअरटेकरसोबत ती अत्यंत गोडीगुलाबीने वागत होती. त्यानंतर तब्बल १२ तास तिला सतत सलाईनही देण्यात येत होते. सकाळी ६ वाजता गीताने शेवटचा श्वास घेतला.रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहायक आयुक्त मनोहर देवरे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पी. एन. पांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. यू. भालेराव, वन विभागाचे एस. आर.भांबळे, सुरेश पुंड यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.सध्या सिद्धार्थमध्ये सचिन (वय-१३) आणि राणी (वय-२०) हे दोनच पांढरे वाघ आहेत. इतर वाघांची संख्या ५ आहे. एकूण ७ वाघ उद्यानात आहेत. मनपाने यापूर्वी पुण्याच्या प्राणि संग्रहालयाला एक वाघ दिला आहे. इंदौर येथील प्राणिसंग्रहालयाला एक जोडी दिली आहे. बोरीवली आणि झारखंड येथेही प्रमोद आणि भानुप्रिया यांची पिल्ले देण्यात आली आहेत. आता मनपा पांढऱ्या वाघांची पिल्ले आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.आजारपणामुळे गीताचे वजन कमालीचे घटले होते. साधारण वाघ-वाघिणीचे वजन २०० ते २२५ किलो असते. गीता मरण पावली त्यावेळी तिचे वजन फक्त १२५ किलो होते. नाकापासून शेपटीपर्यंत लांबी २५८ सेंटीमीटर, पुढचे पाय १०७ सें. मी. तर पाठीमागचे पाय ११२ सें. मी. होते. पोटाचा घेर ९८ सें. मी. होता.