औरंगाबाद : महापालिका लेखा विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यास आयुक्त प्रकाश महाजन यांनी सुरुवात केली आहे. लोकमतने १६ सप्टेंबरच्या अंकात लेखा विभागातील अनागोंदी स्टिंग आॅपरेशन करून चव्हाट्यावर आणली. तसेच मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनीदेखील एका प्रकरणात लेखा विभागातील अनागोंदीचा गुप्त अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर अफरातफरीचे गुन्हे दाखल झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे लोकमतने समोर आणले होते. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये धनादेशावरून चार वेळा हाणामाऱ्या, वाद होण्याच्या घटना घडल्या. त्या घटनांना आयुक्तांनी गंभीरतेने घेतले. पर्यायी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लेखा विभागात पाठविण्याबाबत प्रशासनाने विचार सुरू केला आहे. तक्रारींची दखल पालिकेची फुटकळ कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी आयुक्त महाजन यांना निवेदन देऊन लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. त्या तक्रारीबाबत आयुक्तांनी विचार सुरू केला आहे. दरम्यान, उपायुक्त किशोर बोर्ड यांनी लिपिक बाबूराव मोरे यांची प्रभाग ‘ड’ मध्ये बदली केल्याचे आज सायंकाळी सांगितले.
मनपा लेखा विभागातील बदल्यांना सुरुवात...!
By admin | Updated: September 21, 2014 00:42 IST