शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

नियमांत बदल, बँकेतील लॉकर्सचा करार अपडेट केला का ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 1, 2024 19:44 IST

लॉकरला मागील ३ वर्षांत मोठी मागणी वाढली आहे, शहरात २२९ बँकांचे ३९ हजार लॉकर्स

छत्रपती संभाजीनगर : मागील तीन वर्षांत चोरट्यांनी शहरातील ४२४ घरे फोडली. यामुळे सोन्या-चांदीचे दागिने असोत की महत्त्वाचे दस्तऐवज; ते घरात न ठेवता शहरवासीय बँकेतील लॉकर्समध्ये ठेवणे पसंत करीत आहेत. यामुळे शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांतील ३९ हजारांपैकी बहुतांश लॉकर्स बुक झाले आहेत. नवीन लॉकर्स पाहिजे असल्यास ‘वेटिंग’ करावी लागत आहे. १ जानेवारीपासून बँक लॉकर्सच्या नियमात बदल होणार आहेत. ८० टक्के लॉकरधारकांनी नवीन करारावर स्वाक्षरी केली आहे.

शहरात ३९ हजार लाॅकर्सआजघडीला शहरात २२९ बँकांच्या ४९१ शाखा आहेत. काही शाखांमध्ये लाॅकर्सची व्यवस्था नाही. जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार शहरातील बँकांमध्ये ३९ हजार लॉकर्स आहेत.

१० टक्के लॉकर्सचे नवीन करार, नूतनीकरण झालेच नाही१ जानेवारी २०२४ पासून बँकेच्या लॉकर्सच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यासाठी लॉकर्सची नूतनीकरण प्रक्रिया डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. विविध बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० टक्के लॉकरधारकांनी नवीन कराराचे नूतनीकरण केले आहे. बाकीचे बहुतेकजण येत्या आठवडाभरात करतील, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात बँकांच्या शाखाबँक--- संख्या---- शाखा१) राष्ट्रीयीकृत १२---- १९७२) खासगी १६--- ९३३) स्मॉल फायनान्स बँक ०८---२५४) पेमेंट बँक ०१--०१५) महाराष्ट्र ग्रामीण बँक-- ०१---३७६) डीसीसी बँक ०१---१३८

नवीन कराराचे ९८ टक्के नूतनीकरणलॉकरला मागील ३ वर्षांत मोठी मागणी वाढली आहे. आमच्याकडे ५८०० लॉकर्स असून, मोठे-मध्यम व लहान आकारातील बहुतांश लॉकर्स बुक आहेत. अनेक शाखेत नवीन लॉकरसाठी ३ ते ६ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. ९८.५० टक्के लाॅकरधारकांनी नवीन कराराचे नूतनीकरण केले आहे.-प्रवीण नांदेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी बँक

१ हजार लाॅकर, वेटिंग सुद्धालॉकर्सचे नवीन नूतनीकरण करार करण्यासाठी मुदत वाढविण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून काही नवीन आदेश आले नाहीत. सेंट्रल बँककडे १ हजार लॉकर्स असून, त्यातही वेटिंग सुरू आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक लाॅकरधारकांनी नूतनीकरण केले आहे.-हेमंत जामखेडकर, कोषाध्यक्ष, एआयसीबीईएफ

...तर लॉकरधारकांना नुकसानभरपाईबँकेवर दरोडा पडला किंवा लॉकर्समधून काही गहाळ झाले, बँकेला आग लागली, तर अशा परिस्थितीत लॉकरधारकांना नुकसानभरपाई देणे संबंधित बँकेला बंधनकारक आहे. यामुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणखी वाढला आहे.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँक