शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

चंद्रदर्शन झाले, रमजान आजपासून

By admin | Updated: June 30, 2014 01:02 IST

औरंगाबाद : रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले आणि शहरात आनंदाचे वातावरण पसरले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘रमजान मुबारक हो’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

औरंगाबाद : रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले आणि शहरात आनंदाचे वातावरण पसरले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘रमजान मुबारक हो’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या. चंद्र दिसल्यावर ‘तरावीह’च्या विशेष नमाजमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. उद्या सोमवार ३० जून रोजी रमजानचा पहिला रोजा असणार आहे. सोमवारी पहिला रोजा असल्याने ‘सहरी’ (रोजा ठेवण्यासाठी सूर्योदयापूर्वी करण्यात येणारे जेवण) च्या तयारीला सुरुवात झाली. रविवारी चंद्राचे दर्शन होणार हे निश्चित होते, त्यामुळे सकाळपासूनच विविध सामान खरेदीसाठी बाजारपेठेत मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. विशेषत: पेंडखजूर, दूध, दुग्धजन्य पदार्थ व फळ खरेदीसाठी सायंकाळी दुकानावर गर्दी झाली होती. शहरातील मुस्लिम भागात रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी होती. नागरिक आवश्यकतेनुसार खाद्यपदार्थ आदी सामान खरेदी करण्यात मग्न झाले होते. तसे मागील १५ ते २० दिवसांपासून रमजानची तयारी सुरू झाली होती. चंद्रदर्शन झाल्यामुळे ३० जूनपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. रमजान महिन्यात रात्रीची नमाज अर्थात ‘ ईशा’ की नमाजसोबत पढल्या जाणारी विशेष नमाज ‘तरावीह’ची तयारी करण्यात आली. ‘तरावीह’साठी ‘हाफीज’ची नियुक्तीही पूर्वीच करण्यात आली. चंद्रदर्शन होताच मशिदीत ‘तरावीह’ची नमाज पढली. मशिदीशिवायही काही ठिकाणी ‘तरावीह’ च्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. रमजान महिन्याला तीन भागात (अशरा) वाटण्यात येते. यात पहला ‘अशरा’अर्थात दहा दिवस ‘रहमत’चे असतात. ‘कुराण’ व ‘रमजान’चा हा संबंध लक्षात घेता, विशेष नमाज ‘तरावीह’ मध्ये ‘कुराण’ पाठ करण्यात येत आहे. सामान्यत: मशिदीमध्ये दररोज सवा ‘पारा’(कुराणचा हिस्सा) पासून तीन ‘पारे’पर्यंत पठण केल्या जाते. काही ठिकाणी पाच ते सहा ‘पारे’ पर्यंत पठणाची व्यवस्था करण्यात आली आहे.