शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला घोडीचा फडशा

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

बारड : मुदखेड तालुक्यातील बारड वनपरीक्षेत्रातील मौजे डोंगरगाव शिवारात बिबट्याने पाळीव घोडीवर हल्ला चढवून फडशा पाडल्याची घटना घडली़

बारड : मुदखेड तालुक्यातील बारड वनपरीक्षेत्रातील मौजे डोंगरगाव शिवारात बिबट्याने पाळीव घोडीवर हल्ला चढवून फडशा पाडल्याची घटना घडली़डोंगरगाव शिवारात शेतकरी रामराव सखाराम व्यवहारे यांच्या शेतात १० आॅगस्टच्या पहाटे पाळीव घोडीवर बिबट्याने हल्ला चढविला़ बिबट्या गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात दडी मारून असल्याने आजपर्यंत त्याने २४ जनावरांच्या शिकारी करून वैजापूर पार्डी येथील शेतकरी रुस्तुम पवार यांच्यावर २३ जून रोजी हल्ला करून जीवघेणा हल्ला केला होता़ सुदैवाने यात ते बचावले़ यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे़ जंगलात पिण्यासाठी पाणी नसल्याने वन्यप्राणी शेताकडे येत असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी आऱएल़ पाटील यांनी दिली़ उपवनसंरक्षक एस़बी़डोडग ल यांच्या मार्गदर्शनानुसार वनपरीक्षेत्र अधिकारी पाटील, वनपाल नाईक, वनरक्षक एम़एम़ पवार, वनरक्षक गोविंद इर्लेवाड, एस़आऱशेख, बी़एस़ बबूलवाड यांनी डोंगरगाव येथे घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले़ तहसीलदारांच्या आदेशावरून महसूल विभागाने या घटनेची दखल घेवून मंडळ अधिकारी एनक़े़ वाघमारे, तलाठी जी़एच़ठाकूर यांनी पंचनामा केला़ सदर घोडीची किंमत ३ लाख रुपये आहे़ ही घोडी मरेमाय या देवीची आहे़ या घोडीला भक्तीभावाने परिसरातील भक्त मानत असत़ वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ यावेळी विजय पाटील, शिवाजी कस्तुरे, संदीप व्यवहारे, श्रीनिवास महादवाड, पिराजी केदारे, गणेश व्यवहारे, बापूराव कस्तुरे, गजानन देशमुख, दीपक व्यवहारे, सूर्यभान पाटील, भीमराव पुयड, श्यामराव व्यवहारे, गंगाधर व्यवहारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते़ बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून तो हिंसक आहे़ वनविभागाकडून आम्ही गस्तीसाठी पथक नेमले असून त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहोत़ या घोडीची नुकसान भरपाई वनविभागाकडून आठ दिवसात प्रयत्न मिवून देण्याचा प्रयत्न करीन - आऱएल़ पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी़ (वार्ताहर)