शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 00:03 IST

आष्टी तालुक्यातील मंगरूळ सारख्या खेडेगावातील सोनाली तोडकर या मुलीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवून सिंगापुर येथे होणाऱ्या आॅलिम्पिकच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत निवड झाली आहे.

गणेश दळवी आष्टीतालुक्यातील मंगरूळ सारख्या खेडेगावातील सोनाली तोडकर या मुलीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवून सिंगापुर येथे होणाऱ्या आॅलिम्पिकच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत निवड झाली आहे. पण तिच्या सिंगापूर वारीवर अनिश्चिततेचे ढग आहेत ते तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे. ‘सुलतान’ चित्रपटाची आठवण करून देणारी सोनाली तोडकरची ही कहाणी आहे.जिल्ह्यात सतत दुष्काळात होरपळणारा तालुका म्हणजे आष्टी तालुक्याचे आवर्जुन घेतलं जाते. याच तालुक्यात खेळाडू तयार होण्याचीही खाणच अनेक वर्षांपासून निर्माण झालेली आहे. तालुक्यातील मंगरुळ येथील महादेव तोडकर या शेतकऱ्याची मुलगी सोनाली हिला लहानपणापासुन खेळांची आवड होती. शाळा महाविद्यालयात असताना सोनालीने कुस्ती खेळाचे धडे गिरवले. तालुका, जिल्हा विभाग, राज्य राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सोनालीने गाजवल्या. नुकत्याच उत्तरप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सोनाली तोडकरने आपला खेळ करत रौप्यपदक मिळवत निवड समितीच लक्ष वेधून घेतलं. आता ती सिंगापूर येथे होणाऱ्या आशिया कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेत सोनाली तोडकर खेळणार आहे. पण ती खेळण्यासाठी गरज आहे ती पैशाची.दरम्यान, ग्रामीण खेळाडूंमध्ये शारिरीक क्षमता, जिद्द असतानाही त्यांच्या यशाच्या मार्गात आर्थिक अडचणींचा डोंगर उभा असतो. त्यांच्यासाठी मदतीचे हात हवे आहेत.