औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नांनी व खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून ब्रिजवाडी- सायननगरातील दोन सिमेंट आणि एका डांबरी रस्त्याचे आणि आंबेडकरनगरातील गल्ली नं. ५ मधील सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंकज फुलपगर, माजी नगरसेवक राधाकृष्ण गायकवाड, सिडको हडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबन डिडोरे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अशोक डोळस यांची प्रमुख उपस्थिती होती. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे स्वागत ब्रिजवाडीत फटाक्यांची आतषबाजी करून ढोल-ताशांच्या गजरात, तर आंबेडकरनगरात पुष्पवर्षावाने करण्यात आले. ज्या रस्त्यावर पावसाळ्यात पायी चालणे त्रासदायक होते आता त्या रस्त्याचे रूपच पालटल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली.ब्रिजवाडी येथील कार्यक्रमास काँग्रेसचे शहर सचिव सुभाष हिवराळे, वॉर्ड अध्यक्ष रामेश्वर निकाळजे, कुंडलिक हिवराळे, महिला अध्यक्ष मंदाबाई जाधव, कांता सोनवणे, मोहन खरात, अॅड. सदानंद सोनवणे, मायादेवी हिवराळे, सुमनबाई पोटे, शकुंतला खरात, रोहिणी हिवराळे, संगीता नगराळे, अंकुश सोनवणे, कारभारी निकम, भास्कर म्हस्के, अनिल धानोरकर, मिलिंद इंगळे, पंकज देशमुख, राकेश रामटेके, हनीफ शहा, सचिन आळिंग, मगन रगडे, दिलीप मुगदल, गणपत पवार, विजया भोळे, शेखर निकम, जय खरात, दीपक पोटे, रमेश नीळ, दशरथ गजरे, नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंबेडकरनगरमध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाच्या लोकार्पण सोहळ्यास नगरसेवक सुरेश इंगळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष विमल मापारी, शशिकला मगरे, अॅड. कांताबाई घुसळे, अनिल घुसळे, अॅड. रवी तायडे, संतोष भारसाखळे, प्रेम सोनटक्के, दिनेश गंगावणे, शीलाबाई मोकळे, पंचशीला घोरपडे, अनुसया दणके, टी.ए. लिहिणार, किसन भिवसने, चक्रधर मगरे, अरुणा डोंगरे, विलास साळवे, चंद्रमणी साळवे, विजय मोरे, विठ्ठल खरात, निवृत्ती घोरपडे, रमाकांत मगरे, चंद्रकला साळवे आदी उपस्थित होते. विकासकामांचा केवढा आनंद महापालिका असतानाही औरंगाबाद शहरातील अनेक झोपडपट्ट्या आजही विकासापासून वंचितच आहेत. गुंठेवारीचा भाग जसा विकासापासून दूर तद्वतच झोपडपट्ट्याही दूरच; पण औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील गुंठेवारीचा भाग आणि झोपडपट्ट्या भाग्यवान म्हटल्या पाहिजेत. राजेंद्र दर्डा यांच्यासारखा लोकप्रतिनिधी त्यावर उपाययोजना करण्याचा ध्यास घेतो. ब्रिजवाडीसारखी वसाहत आजही अनेक विकासकामांपासून वंचित आहे. राजेंद्र दर्डा हे सिमेंट रस्त्याच्या लोकार्पणासाठी वस्तीत आले आणि तेथील लोकांचे चेहरेच खुलून गेले. अनेक गैरसोयींचा सामना करीत जगणाऱ्या येथील नागरिकांना चांगला सिमेंट रस्ता मिळाला होता. चकचकीत रस्त्याचा आता खूप चांगला वापर होणार, असा आत्मविश्वास ते व्यक्त करीत होते. अर्थात एक प्रश्न सुटला की, दुसरा प्रश्न तयारच असतो. राजेंद्र दर्डा सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करून ब्रिजवाडी सोडेपर्यंत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरूच होता. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नाहीत, इथपासून ते आमच्या गल्लीत चला, पाणी येत नाही, ड्रेनेजचे काम झाले नाही... वगैरे... वगैरे. आंबेडकरनगरातल्या सिमेंट रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याचा आनंद किती मोठा. आपल्या घरावरून अनेकांनी पुष्पवृष्टी करून आपला हा आनंद व्यक्त केला. ‘आपण मला खूप प्रेम दिलंय. या पुढंही ते असू द्या.’ एवढ्या मोजक्या शब्दांत राजेंद्र दर्डा हे आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.
ब्रिजवाडीत सिमेंट रस्ते व डांबरीकरण
By admin | Updated: July 15, 2014 01:01 IST