शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

रमजान ईद उत्साहात साजरी

By admin | Updated: July 30, 2014 00:55 IST

उस्मानाबाद : मुस्लिम धर्मियांचा महत्त्वपूर्ण सण असलेली रमजान ईद मंगळवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली़

उस्मानाबाद : मुस्लिम धर्मियांचा महत्त्वपूर्ण सण असलेली रमजान ईद मंगळवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली़ सकाळी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करून चांगला पाऊस पडावा, यासाठी अल्लाहकडे दुआ करण्यात आली़ त्यानंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेतेमंडळींसह अधिकारी, सर्वधर्मीय नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती़ उस्मानाबाद येथील ख्वॉजा नगर परिसरातील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी माजी खासदार डॉ़ पद्मसिंह पाटील, माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, जि़ प़ उपाध्यक्ष संजय पाटील, मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़परंडा शहरात करमाळा राज्यमार्गावरील ईदगाहवर सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या़ शहरे काजी यांच्या उपस्थितीत आसिफअली काजी यांच्या घरापासून वाजत गाजत निघालेला मुस्लीम बांधवाचा मेळा सकाळी ९ च्या सुमारास करमाळा राज्यमार्गावरील ईदगाह मैदानावर पोहोचला. यावेळी नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या़ यावेळी ईदगाह मैदानावर तहसीलदार स्वरुप कंकाळ, पोलीस निरीक्षक हनुमंत वाकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पारवे पाटील, नायब तहसीलदार एस. एस. पाडळे, पेशकार चित्तेवार, रांजणकर उपस्थित होते. भूम येथे नगर रोडवरील इदगाह मैदान येथे सर्व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण पार पडले. गटनेता संजय गाढवे व नगरसेवकांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी उपस्थित समाजबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कळंब शहरातील ईदगाह मैदानावर माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या़ (प्रतिनिधी)ग्रामीण भागातही उत्साहशहरी भागासह ग्रामीण भागातही रमजान ईदचा उत्साह दिसून आला़ सर्वधर्मियांनी ईदमध्ये सहभागी होऊन मुस्लिम धर्मियांना शुभेच्छा दिल्या़ सर्वत्र शांतेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली़उमरगा येथे उत्साहातउमरगा शहर व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी, अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ आ़ ज्ञानराज चौगुले, संताजी चालुक्य, नेताजी गायकवाड, माधव पवार, जि.प. सदस्य कैलास शिंदे, बाबूराव शहापुरे, नगरसेवक विजय दळगडे, अतिक मुन्शी, विजय वाघमारे, सतीश सुरवसे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़माणकेश्वरात मार्गदर्शनभूम तालुक्यातील माणकेश्वर येथे ईद सामूहिक नमाज अदा करण्यात आल्यानंतर इमाम बुबकर अहेमद अलहामेद (हाफीज) व जक्रीया उस्मान शेख बाबजीर यांनी रमजान ईदचे महत्व सांगितले. यावेळी परंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़