शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

उस्मानाबाद शहरावर ‘सीसीटीव्ही’ची नजर !

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

विजय मुंडे , उस्मानाबाद येथील पालिका कार्यालयातील विविध विभागासह शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़

विजय मुंडे , उस्मानाबादयेथील पालिका कार्यालयातील विविध विभागासह शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ पालिकेच्या या निर्णयामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानीला लगाम लागणार असून, शहरातील विविध घटना, घडामोडीही सीसीटीव्हीत कैद होणार आहेत़उस्मानाबाद पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनमानी, दुपारनंतर ओस पडणारे कार्यालये, विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ या तक्रारी व इतर कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी पालिका प्रशासनाने पालिकेतील विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे नियंत्रण मुख्याधिकारी व अध्यक्षांच्या कार्यालयातून होणार आहे़ यात कार्यालयासह नगररचनाकार, सुवर्णजयंती विभाग, स्टोअररूम, वसुली विभाग, लेखाविभाग, प्रवेशद्वार, कॉरिडोअर आदी विविध विभागात जवळपास १५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ पालिकेच्या कार्यालयांसह शहरातील शिवाजी चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकासह वर्दळीच्या नऊ ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ शहरातील कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडून व्हावे, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे़ कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून, काही दिवसातच विविध विभागांसह शहरातील हालचाली कैद होणार आहेत.पोलिसांनाही होणार मदतउस्मानाबाद नगरपालिकेतील अनेक कर्मचारी कार्यालयातून गायब राहतात़ नागरिकांनी अनेकवेळा याबाबत तक्रारी करून, अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केल्यानंतरही संबंधितांचा मुजोरी कारभार सुरूच होता़ मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने कोणता अधिकारी, कर्मचारी कोणत्या वेळेत गायब होता, हे समोर येणार आहे़ त्यामुळे येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोयही टळणार आहे़शहरातील वाढत्या चोऱ्या, बँक ग्राहकांची होणारी लूट, अपघातानंतर फरार होणारे वाहन आदी बाबी या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत़ पालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील विविध चौकात, रहदारीच्या, वर्दळीच्या ठिकाणी होणारे गुन्हे आणि त्यातील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना या कॅमेऱ्यांची मोठी मदत होणार आहे़ यामुळे चोऱ्यांच्या घटनांनाही काहीअंशी लगाम लागणार असल्याचे दिसत आहे़दर्जेदार कॅमेऱ्यांची गरजउस्मानाबाद नगरपालिकेकडून कार्यालयासह विविध चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे़ हे कॅमेरे बसवितानाच उत्तम दर्जाचे बसविण्याची गरज आहे़ यापूर्वी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दर्जेदार नसल्याने एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनाही अडचणी आल्या आहेत़ त्यामुळे गुन्हेच नव्हे, तर इतर बाबींची सुस्पष्ट माहिती मिळविण्यासाठी दर्जेदार कॅमेरे बसविण्याची गरज आहे़२० लाख रूपये खर्च अपेक्षितपालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांना रोख लावून शहरातील शांतता कायम राखण्यासाठी शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणीही हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ यासाठी साधारणत: २० लाख रूपये खर्च अपेक्षित असून, लवकरच हे कॅमेरे सुरू होणार आहेत़