जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टार कॅफेसमोर बायजीपुरा कॉर्नर येथे एका गाडीतून (एम.एच.२३, ए.डी.१७९३) गोवंशाच्या मांसाची अवैधपणे वाहतूक करण्यात येत आहे. यानुसार, कर्तव्यावरील अधिकारी उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी मनपाचे पशुसंवर्धन अधिकारी प्रमुख सय्यद कय्युम यांना माहिती देत घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा तीन ते साडेतीन क्विंटल गोवंश मांस गाडीत आढळून आले, तसेच गाडीत शेख साबेर शेख जहीर हुसेन, मुसर गफार कुरैशी (दोघेही रा.ब्राह्मणगाव, ता.पैठण) दोघे होते. मांसासह त्यांना ताब्यात घेत, सय्यद कय्युम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ठाकूर करीत आहेत. ही कामगिरी निरीक्षक व्यंकट केंद्रे, उपनिरीक्षक ठाकूर, सहायक फाैजदार संपत राठोड, नागनाथ बनसोड, चालक शेख एजाज, नरेंद्र दीक्षित यांनी केली.
अवैधपणे गोवंश मांसाची वाहतूक करणारे पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:05 IST