औरंगाबाद : लोकमत व गीतम युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ रोजी ‘गीतम स्कॉलर २०१६’ करिअर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जालना रोडवरील लोकमत भवनच्या पाठीमागील हॉलमध्ये दुपारी ४ वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार आहे. चर्चासत्रात हैदराबाद येथील गीतम युनिव्हर्सिटीचे सहायक प्रशासकीय संचालक डॉ. के. शिवकुमार व पुणे विद्यापीठातील सहायक प्रोफेसर वैभव जोशी मार्गदर्शन करणार आहेत. बारावीनंतर कोणते कोर्स, विषय निवडावेत, बारावीत कसा अभ्यास करावा, हे प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. त्याची रुची कशात आहे. योग्य विषय निवडून तो आयुष्यात यशस्वी व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पालकांच्या अशा सर्व शंकांचे निरसन या चर्चासत्रात केले जाणार आहे. जे विद्यार्थी आपल्या भविष्याबद्दल उत्सुक आहेत. योग्य करिअर निवडण्यासाठी त्यांना अडचणी येतात, अशा विद्यार्थ्यांना मत तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. यात ११ वी व १२ वीचे विद्यार्थी व पालकांना सहभागी होता येणार आहे. यावेळी गीतम स्कॉलर २०१६ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. याशिवाय पालकांसाठी विशेष ‘पापा कहते है’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. वर्ल्ड क्लास ‘गीतम’विशाखापट्टणम येथील गांधी इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (गीतम) विद्यापीठाने अल्पावधीतच देशातील नामवंत विद्यापीठांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या या विद्यापीठाचे विशाखापट्टणमसह हैदराबाद व बंगळूर येथे कॉलेज कॅम्पस आहेत. विद्यापीठाला नॅककडून ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. संपूर्ण विद्यापीठात सुमारे ११ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
करिअर मार्गदर्शन चर्चासत्र रविवारी
By admin | Updated: January 15, 2016 00:08 IST