शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

अनेक जागाही दिल्या ९९ वर्षांच्या सर्व लीज रद्द करा

By admin | Updated: November 8, 2016 01:31 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहेत. हे सर्व करार त्वरित रद्द करावेत, असे आदेश

औरंगाबाद : महापालिकेच्या मालकीचे अनेक भूखंड ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहेत. हे सर्व करार त्वरित रद्द करावेत, असे आदेश सोमवारी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले. मनपाने खरोखरच उद्या लीज रद्द केल्यास कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडतील. बीओटी तत्त्वावर सर्वात जास्त भूखंड मनपाने दिले आहेत.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी सकाळी ९.३० वाजता सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीत लीजवर अनेक मालमत्ता देण्यात आल्याचे समोर आले. महापालिकेच्या मालकीच्या किती मालमत्ता कोणाला करारावर देण्यात आल्या आहेत, याचा तपशील सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. ९९ वर्षांच्या करारावर असलेल्या सर्व लीज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे आदेश मालमत्ता विभागाला दिले. आयुक्तांच्या या निर्णयाने विभागप्रमुख क्षणभर स्तब्ध झाले होते. कोणालाही काहीच बोलता येत नव्हते. या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतील याची पूर्णपणे जाणीव विभागप्रमुखांना होती. मात्र, एकाही अधिकाऱ्याने याला विरोध केला नाही. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर होता.मागील दहा वर्षांमध्ये मनपाने बीओटी तत्त्वावर अनेक प्रकल्प राबविले. हे प्रकल्प राबविताना मनपाला कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल, असे भासविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मनपाला लाखो रुपये मिळाले आणि ज्यांना कोट्यवधी रुपयांच्या जमिनी दिल्या त्यांना कोट्यवधींचा फायदा झाला. ४सिद्धार्थ उद्यान येथील फूड प्लाझाची जागा ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आली आहे. हा प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. शहानूरमियाँ दर्ग्यासमोर ९९ वर्षांच्या करारावर युरोपियन मार्केट तयार करण्यात आले. येथील कोट्यवधींची जागा खाजगी व्यक्तींना देण्यात आली. रेल्वेस्टेशन येथेही मनपाने बीओटीवरच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले. याशिवाय काही प्रकल्प ३० वर्षांच्या करारावर देण्यात आले आहेत.महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये अत्यंत मोक्याच्या जागा अगदी कवडीमोल भाडेतत्त्वावर विविध संस्था, संघटनांना ९९ वर्षांच्या लीजवर देण्यात आल्या आहेत. यामध्ये सिटीचौकातील बीएमसी बँक, अंजली चित्रपटगृहाजवळील सारस्वत बँक, जाफरगेट येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेल्वेस्टेशन भागातील जागा, औषधी भवन, श्रीमान श्रीमती, सुराणा कॉम्प्लेक्स आदी जागांचा समावेश आहे.