भोकरदन : संपूर्ण जालना जिल्हात युरीया मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी भोकरदन तालुक्यात युरिया उपलब्ध झाला आहे. कोणत्याही शेतकऱ्याला युरिया कमी पडू नये म्हणून युरियाचा मोठा पुरवठा करण्यात आला आहे. चढ्या भावाने युरिया खरेदी न करता शासकीय भावाने युरीया खरेदी करण्याच्या सूचना कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी केल्या आहे. गंजेवार यांच्या उपस्थितीत सोमवारी शेतकऱ्यांना युरियाचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.कृषी सहाय्यकाच्या उपस्थितीत सर्वच व्यापाऱ्यांनी युरीया शासकिय दरानेचे विकण्याचे आदेश सर्व व्यापाऱ्यांना दिले आहे. कोणीही चढ्या भावाने युरियाची विक्री करतांना आढळून आल्यास त्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे गंजेवार यांनी स्पष्ट केले.सोमवारी कृषी अधिकारी गंजेवार यांनी भोकरदन येथे भेट दिली असता बहुतांश व्यापाऱ्यांनी आलेल्या युरीया काळ्या बाजारात विकण्यासाठी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना युरीया खरेदी करता आला नाही. तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर युरिया उपलब्ध आहे. तो शासकीय दराने विकत घेण्याचे आवाहन गंजेवार यांनी केले. जादा दराने कोणी विक्री करीत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
शासकीय दरानेच युरिया खरेदी करा
By admin | Updated: September 17, 2014 01:11 IST