शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बस-कारची धडक; दोघांचा मृत्यू

By admin | Updated: August 17, 2015 01:04 IST

नळदुर्ग : भरधाव वेगातील कार- सीटीबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला़ तर तिघे गंभीर जखमी झाले असून

नळदुर्ग : भरधाव वेगातील कार- सीटीबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला़ तर तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सोलापूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ हा अपघात रविवारी दुपारी सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील धनगरवाडी (ता़तुळजापूर) पाटीजवळ घडला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील धनगरवाडी पाटीजवळ रविवारी दुपारी नळदुर्गकडे निघालेली सोलापूर महानगर पालिकेची सीटी बस (क्ऱएम़एच़१३- ए़एक्स़ ९५२०) व मुरूम येथून पुण्याकडे जाणारी कारची (क्ऱएम़एच़१४- सी़एक्स़४३५३) समोरासमोर धडक झाली़ या अपघातात कारमधील ज्ञानेश्वर कोंडीबा भूजबळ (वय-३८ रा़ वडगाव गांजा ता़लोहारा ह़मु़पुणे) व लक्ष्मीबाई बळी गिराम (वय-७० रा़ वडगाव वाडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ तर या अपघातात केतन सिद्रामप्पा कारभारी (वय- २८ रा़ जळकोट), शांतेश्वर शिवराज मुदकण्णा (रा़मुरूम ता़उमरगा), अंजी श्रीकांत करपे (वय- २० रा़ अणदूर ता़तुळजापूर) हे तिघे जखमी झाले आहेत़ जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले होते़सोलापूर महानगर पालिकेच्या सीटी बसमधील १९ प्रवाशी या अपघातातून बालंबाल बचावले़ अपघात इतका भीषण होता की बसचालकाने ब्रेक मारल्यानंतर साधारणत: २० फूटापर्यंत रस्ता उखडला होता़ घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि फुलचंद मेंगडे यांच्यासह पोना खलील शेख, नवनाथ बांगर, गोपाळ घारगे, राजीव चव्हाण, अमोल तांबे, सचिन मुंडे, कृष्णा जाधव आदीनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत केली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर)