शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

उमरग्यात घरफोडी; दागिने, रक्कम लंपास

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

उमरगा : घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवून रोख साडेतीन लाख रूपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेपाच लाख रूपयांचा

उमरगा : घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवून रोख साडेतीन लाख रूपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेपाच लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी रात्री शहरातील दर्गाह गल्ली जुनी पेठ भागात घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील आरटीओ एजंट म्हणून कार्यरत असलेले महंमद मुसा अब्दूल मज्जीद काझी ऊर्फ जॅकी काझी हे येथील दर्गाह गल्ली जुनी पेठ भागात वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास काझी हे घराचा दरवाजा पुढे करून बाहेर गेले होते. चहा पिऊन घरी येईपर्यंत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडून आतील रोख साडेतीन लाख रूपये, सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या असे १ लाख ९५ हजारांचे दागिने असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला.काझी हे घरी परत आल्यानंतर त्यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनीही चोरट्यांची शोधाशोध केली. मात्र, हे प्रयत्न व्यर्थ गेले. याप्रकरणी जॅकी काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत कासले करीत आहेत. (वार्ताहर)