शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, खासगी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांचा भार वाढत आहे. बहुतांश खासगी रुग्णालयांतील ...

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, खासगी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांचा भार वाढत आहे. बहुतांश खासगी रुग्णालयांतील खाटा फुल्ल झाल्या आहेत. अशा अवस्थेत तारेवरची कसरत करून रुग्णसेवा दिली जात आहे. मात्र, एकीकडे रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे, तर दुसरीकडे पूर्वीपेक्षा क्षमता वाढवूनही कोरोना रुग्णांसाठी आणखी खाटा वाढविण्याचे आव्हान खासगी रुग्णालयांपुढे उभे राहिले आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा जेवढे खासगी रुग्णालय, खाटा उपलब्ध होत्या, त्यापेक्षा अधिक रुग्णालये सध्या कोरोना रुग्णांवर उपचार देत आहेत. खाटांची संख्याही वाढली आहे, तरीही रुग्णांपुढे खासगी रुग्णालयांच्या खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे खाटा वाढविण्याचे नियोजन रुग्णालयांकडून केले जात आहे; परंतु मनुष्यबळाच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, शिवाय इतर आजारांची रुग्णसेवाही सुरळीत ठेवावी लागत आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांना खाटा वाढविण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पूर्वीपेक्षा क्षमता वाढली; पण..

गतवर्षीच्या तुलनेत यावेळी खासगी रुग्णालयांवर अधिक भार आला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा खासगी रुग्णालयांची क्षमता अधिक वाढली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची जबाबदारी वाढली आहे; परंतु रुग्णसंख्येच्या तुलनेत आणखी खाटा वाढविण्यास अडचण येत आहे. जीवनदायी योजना, कॅशलेश, विमा या माध्यमातून खासगी रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

- डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन

खासगी रुग्णालयांतील कोरोना रुग्णांची स्थिती (बुधवार सायंकाळपर्यंत)

रुग्णालय --- खाटांची क्षमता ---- दाखल रुग्ण

१) शंकर चेस्ट हाॅस्पिटल २० २०

२) गजानन हाॅस्पिटल ५० ४८

३) श्रद्धा हाॅस्पिटल २८ २७

४) लाइफ मल्टि हाॅस्पिटल ४३ ४३

५) आशिष हाॅस्पिटल ३५ ३५

६) लाइफलाइन हाॅस्पिटल ७५ ७०

७) धनवई हाॅस्पिटल २० २०

८) मेडिकव्हर हाॅस्पिटल ११२ १००

९) जे.जे. प्लस हाॅस्पिटल ५१ ५१

१०) कृष्णा हाॅस्पिटल ९१ ९१

११) अंजता हाॅस्पिटल ३० २८

१२) माणिक हाॅस्पिटल ८४ ८४

१३) एमआयटी हाॅस्पिटल ४४ ४३

१४) ओरिऑन सिटी केअर ४३ ४३

१५) अपेक्स हाॅस्पिटल ८० ७१

१६) एशियन हाॅस्पिटल ७५ ७३

१७) सिग्मा हाॅस्पिटल ९३ ९३

१८) बजाज हाॅस्पिटल १०३ १०३

१९) धूत हाॅस्पिटल १४० १४०

२०) सुमनांजली हाॅस्पिटल ३० २७

२१) वी केअर हाॅस्पिटल ४० ४०

२२) एमजीएम हाॅस्पिटल ५८७ ३८४

२३) एम्स हाॅस्पिटल ६२ ६२

२४) डाॅ. हेडगेवार रुग्णालय ९१ ९१