शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

बैल चोरून विकणारा जेरबंद

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

नळदुर्ग : बैलाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एकास नळदुर्ग पोलिसांनी गुरुवारी रात्री रंगेहाथ अटक केली.

नळदुर्ग : बैलाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एकास नळदुर्ग पोलिसांनी गुरुवारी रात्री रंगेहाथ अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील भीमाशंकर गुर्लिंगप्पा तुपे यांच्या शेतातील गोठ्यातून ७ जून रोजी रात्री एक लाख रूपये किंमतीची बैलजोडी चोरीस गेली होती. याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना तपासाअंती अक्कलकोट तालुक्यातील नागनसूर येथील सिद्दाराम श्रीमंत मुदीनकेरी याने ही बैलजोडी चोरून ती अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे एकास विकल्याची माहिती मिळाली. तसेच तो गुरूवारी मैंदर्गी येथे पैसे देण्यासाठी येणार असल्याचेही समजले.यावरून पोलिसांनी तेथे सापळा लावून सिद्दाराम मुदीनकेरी यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, तुळजापूर न्यायालयाने त्यास १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सिद्दाराम मुदीनकेरी हा स्थलांतर आदेश आणलेला असून, त्याच्याकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सपोनि एम. वाय. डांगे यांनी सांगितले. (वार्ताहर)