शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ब्रुसुलोसीस आजाराचे होणार उच्चांटन

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

परभणी : ब्रुसुलोसीस हा आजार गाय व म्हैस या जनावरांपासून माणसांना होतो. शासनाने यावर्षांपासून ४ ते १२ महिन्यातील जनावरांचे लसीकरण करून या आजाराचे राज्यातून समुळ उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे.

परभणी : ब्रुसुलोसीस हा आजार गाय व म्हैस या जनावरांपासून माणसांना होतो. शासनाने यावर्षांपासून ४ ते १२ महिन्यातील जनावरांचे लसीकरण करून या आजाराचे राज्यातून समुळ उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे. ब्रुसुलोसीस हा आजार जनावरांपासून माणसांना होणारा आजार आहे. मुख्यत: गाय व म्हशीमध्ये हे जीवाणू दिसून येतात. या आजारामुळे माणसाला ताप येणे, गुडघे दुखी, शरीर अशक्त होणे, भूक मंदावने आदी लक्षणे दिसतात. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने १ जुलैपासून ४ ते १२ महिन्यांच्या मादी वासरांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे या आजारावर प्रतिबंध होणार आहे. प्रत्येक पशूवैद्यकीय दवाखान्याला वर्षभरात ५०० लसीकरणाचे उद्दिष्ट दिले आहे, अश्ी माहिती जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद देशपांडे यांनी दिली आहे. लसीकरण मोहीम पशूपालकांनी आपल्या मादी-वासरांना लस टोचून घ्यावी. लस टोचल्यानंतर वासरांना ताप येणे व चारा न खाणे ही लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे, जेणे करून आपल्या मुलांना या आजारापासून बचाव करता येईल तसेच पुढील पिढी सशक्त निर्माण करता येईल, असे डॉ. अरविंद देशपांडे यांनी बोलतांना सांगितले. (प्रतिनिधी)सहा बालकांना आजार २०११ मध्ये परभणी जिल्ह्यातील सहा बालकांना ब्रुसुलोसीस हा आजार जडला होता. या संदर्भात बालरोग तज्ज्ञांनी जि.प. पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद देशपांडे यांच्याशी संपर्क साधून आजाराची लक्षणे जाणून घेतली होती. त्यानंतर हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. कच्चे दूध जनावरांच्या गर्भाशयाच्या स्त्रावामधील जंतू, डोळे अथवा खान्यातून या आजाराचा प्रसार होतो. चार ते बारा महिन्यातील मादी वासरांना लसीकरण करण्यासाठी नामामात्र एक रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे. याचा लाभ पशूपालकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. पशूसंवर्धन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण चर्चासत्रब्रुसुलोसीस या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्या वतीने १३ जून रोजी सकाळी ११ वाजता जि.प.च्या सभागृहात पशूवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील पशूवैद्यकीय डॉ. मार्कण्डेय, जिल्हा पशूसंवर्धन संचालनालयाचे डॉ. प्रल्हाद कांबळे, जि.प.चे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद देशपांडे, डॉ. सोनटक्के, डॉ. बुचाले, डॉ. भंडारी आदींची उपस्थिती होती. या चर्चासत्रात तालुक्यातील पशूवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.