शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॉडबॅण्ड सेवेचे वाजले तीनतेरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:55 IST

शहरात दोन दिवसांपासून बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा विस्कळीत झालेली असतानाही अधिकाºयांना मात्र त्याचे काहीच सोयरसूतक नाही. उडवाउडवीची उत्तरे देवून अधिकारी मोकळे होत आहेत. आधीच अर्ध्यावर मार्केट खाजगी कंपन्यांनी काबीज केले असताना वरून बंदच्या काळात त्यांना बोनस देण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात दोन दिवसांपासून बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा विस्कळीत झालेली असतानाही अधिकाºयांना मात्र त्याचे काहीच सोयरसूतक नाही. उडवाउडवीची उत्तरे देवून अधिकारी मोकळे होत आहेत. आधीच अर्ध्यावर मार्केट खाजगी कंपन्यांनी काबीज केले असताना वरून बंदच्या काळात त्यांना बोनस देण्याचे काम सुरू आहे.हिंगोली जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा दिवसेंदिवस ढेपाळत चालली आहे. अधिकाºयांची रिक्त पदे, परभणीहून चालणारा कारभार, कार्यरत अधिकाºयांची उदासीनता या सर्व पार्श्वभूमिवर ग्राहकांना सेवाच मिळत नाही. किरकोळ बाबीसाठीही तक्रार करावी लागते. त्यानंतरही ही समस्या सुटेल, याची शाश्वतीच नाही. शासन एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहात आहे. तर दुसरीकडे शासन अंगीकृत सेवेचेच हे हाल आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करायची कशी? हा प्रश्न कायम आहे. परंतु अधिकाºयांना त्याचे काहीच नाही. नेहमीच वारंगा येथे समस्या उद्भवत असते.याबाबत स्थानिक अधिकारी निकम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वारंगा येथे पॉवर बँकची समस्या उद्भवली आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पथक पाठविले आहे. ते मॉडेल बदलले जाईल. ते मला जेव्हा कळवतील, तेव्हा ही समस्या दूर होईल. त्यामुळे तोपर्यंत ही समस्या सुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.