शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

श्वासाची दोरी अम्बू बॅगवरच

By admin | Updated: June 28, 2017 00:29 IST

नांदेड: विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका व्हेंटीलेटरवर रुग्णालयाचा कारभार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आजघडीला उपलब्ध असलेल्या एका व्हेंटीलेटरचा संगीत खुर्चीचा खेळ सुरु असून एकाच दिवशी अनेक रुग्णांकडे हे व्हेंटीलेटर फिरवावे लागत आहे़ प्रत्यक्षात दहा व्हेंटीलेटरची आवश्यकता असताना, एका व्हेंटीलेटरवर रुग्णालयाचा कारभार सुरु असून अत्यवस्थ रुग्णांना अम्बू बॅगवरच ठेवण्यात येत आहे़डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण करण्यात आले़ त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन अत्याधुनिक सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या़ येथील आयसीयू आणि एसआयसीयू या दोन्ही विभागात आजघडीला ३० हून अधिक खाटा असून रुग्णसंख्याही तेवढीच आहे़ या सर्व रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास आवश्यक असतो़ सुरुवातीचे काही दिवस या ठिकाणी पाच व्हेंटीलेटर होते़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवून इतर रुग्णांना अम्बु बॅगद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता़ त्यातही रुग्णालय प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत होती़ परंतु मध्यंतरी पाचपैकी तीन व्हेंटीलेटर नादुरुस्त झाले़ त्यामुळे दोन विभागांसाठी दोनच व्हेंटीलेटर उपलब्ध होते़ त्यामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन उसनवारीवर बाहेर जिल्ह्यातून व्हेंटीलेटर आणण्यात आले होते़, परंतु त्यांनीही ते आता परत नेले आहेत़ त्यामुळे सध्या रुग्णालयात एकच व्हेंटीलेटर उपलब्ध आहे़ हेच व्हेंटीलेटर दोन्ही विभागात फिरवावे लागते़ तर इतर अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती अम्बु बॅग देवून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येतो़ नातेवाईकांकडून अम्बू बॅगला दाब देण्यात थोडीही ढिलाई झाल्यास रुग्णाच्या जीवितावर बेतू शकते़ एवढ्या गंभीर प्रकाराबाबत मात्र वैद्यकीय प्रशासनाला कुठलेच गांभीर्य नाही़ रुग्णालयाला अधिकचे व्हेंटीलेटर देण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत़ मुंबई येथील सिद्धीविनायक ट्रस्टकडूनही व्हेंटीलेटर देण्याची तयारी दाखविली होती़ त्यासाठीही महाविद्यालय प्रशासनाने प्रस्ताव पाठविला आहे, परंतु त्याचे पुढे नेमके काय झाले? हे कळायला मार्ग नाही़ त्यामुळे आजघडीला तरी, व्हेंटीलेटरचा संगीत खुर्चीचा खेळ रुग्णांच्या जिवावर बेतणारा ठरु शकतो यात शंका नाही़