जिल्हाधिकारी चव्हाण यांनी रात्री उशिरा केला खुलासा
औरंगाबाद : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत मंगळवारपासून काय चालू, काय बंद राहील याची माहिती सोमवारी रात्री पत्रपरिषद घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.
काय चालू राहील...
अत्यावश्यक सेवा : यात रुग्णालये, औषधी दुकाने, किराणा दुकाने, भाजीमंडई, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने.
सार्वजनिक वाहतूक : यात रिक्षा, रेल्वे, बस (खासगी व एसटी बस), ट्रक
मान्सूनपूर्व कामे
शेतीसंबंधित कामे
प्रसिद्धीमाध्यमांची कार्यालये
सरकारी कार्यालये, विद्युत पुरवठा, टेलिफोन, बँकिंग व्यवहार
कुठल्याही शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नाही.
खासगी वाहतूक व्यवस्था व बुकिंग कार्यालये.
वृत्तपत्रांची छपाई
५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ; पण ५० जणांच्या नावांची यादी प्रशासनाला द्यावी लागेल.
२० जणांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा; पण कोण उपस्थित राहणार याची यादी प्रशासनाला द्यावी लागेल.
सर्व उद्योग. ५०० पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या कारखान्यांना स्वतःचे आयसोलेशन केंद्र सुरू करावे लागेल. कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला पगारी रजा द्यावी लागेल.
ई-कॉमर्स
बांधकाम व्यवसाय; पण कामगारांची राहण्याची सोय तिथल्या तिथे करावी लागेल.
पेट्रोल पंप सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत
कार्गो सर्व्हिसेस, सिक्युरिटी सर्व्हिसेस, फूड सर्व्हिसेस
वकिलांची कार्यालये