शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

विद्यापीठ युरोपियन कमिशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By admin | Updated: February 17, 2015 00:43 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूयुरोपियन दौऱ्यावर गेले होते. संशोधनामध्ये विद्यापीठ सक्षम होण्यासाठी आणि इतर देशांमधील विद्यापीठांचे सहकार्य मिळावे,

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूयुरोपियन दौऱ्यावर गेले होते. संशोधनामध्ये विद्यापीठ सक्षम होण्यासाठी आणि इतर देशांमधील विद्यापीठांचे सहकार्य मिळावे, यादृष्टीने हा दौरा झाला. दौऱ्यात झालेल्या करारानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युरोपियन कमिशनचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होणार आहे. शिवाय भारतातील विद्यापीठांशी समन्वय साधण्यासाठी आशिया खंडातील रिजनल सेंटर विद्यापीठात उभारण्यात येणार आहे.कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे आणि बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे हे पाचदिवसीय युरोपियन दौरा संपवून परतले आहेत. या दौऱ्यात ‘युनिव्हर्सिटी आॅफ सॅन्टिगो’ व ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’ या दोन विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’विद्यापीठाबरोबर फॅकल्टी एक्सचेंजचा करार करण्यात आला आहे. यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक तेथील विद्यार्थ्यांना, तर ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओडियोगो’ विद्यापीठातील प्राध्यापक येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.‘युनिव्हर्सिटी आॅफ सॅन्टिगो’ विद्यापीठाबरोबर असलेल्या पूर्वीच्या शिष्यवृत्तीच्या कराराची मुदत वाढविण्यात आली आहे. शिवाय रत्नागिरी येथे विद्यापीठाच्या असलेल्या केंद्रात मरीन सायन्स विभागाचा विकास आणि विस्तार करण्यासाठी या विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे मरीन पार्क उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे. भारतातील विद्यापीठांबरोबर समन्वय साधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आशिया खंडातील रिजनल आॅफिस उभारण्यात येणार आहे. याबाबत तेथील विद्यापीठात ठराव होणार असून, यासाठी जागा देण्यास सकारात्मकता दाखविली आहे.