शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराला कोट्यवधींचे पार्टी गिफ्ट

By admin | Updated: June 23, 2016 01:36 IST

विकास राऊत , औरंगाबाद सिडकोतील उड्डाणपुलाचे २० जून रोजी थाटात लोकार्पण झाले असले तरी त्या पुलाखाली अजून कोट्यवधी रुपयांची कामे शिल्लक आहेत

विकास राऊत , औरंगाबादसिडकोतील उड्डाणपुलाचे २० जून रोजी थाटात लोकार्पण झाले असले तरी त्या पुलाखाली अजून कोट्यवधी रुपयांची कामे शिल्लक आहेत. ही कामे निविदेत समाविष्ट नसताना आणि कंत्राटदाराने पुलाच्या कामाला ५ महिने विलंब केलेला असताना दंड लावण्याऐवजी ५ कोटींची बक्षीसरुपी कामे दिली आहेत. काम संपल्यानंतर देण्यात येणारे ‘पार्टी गिफ्ट’ म्हणून त्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याव्यतिरिक्त आणखी काही अतिरिक्त कामांचे गिफ्ट कंत्राटदाराला देण्याचा विचार एमएसआरडीसी करीत आहे. त्या पुलाखालील कामांसाठी कंत्राटदाराला आॅगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा कानावर आली आहे. पुलाच्या कामावर ५६ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यात आणखी १० कोटींच्या कामांची भर पडण्याचा अंदाज आहे. पुलाची एकूण लांबी १ कि़ मी. आहे. तर रुंदी १४ मीटर असून, उंची ५.५ मीटर आहे. पूल पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत होती. पुलाच्या कामाला ३० महिने लागले. असे असताना २ महिने शिल्लक वाढवून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. गटर, पाईपलाईन, पुलावर ‘कॅटआय’(वाहतूक रिफलेक्टर) बसविण्याचे काम बाकी आहे. तसेच फुटपाथ, पुलाखाली पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम बाकी आहे. सर्व्हिस रोडदेखील पूर्ण करणे बाकी आहे. डीपी शिफ्ट करणे आदी कामे शिल्लक आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सर्व्हिस रोड तर पावसाळ्यानंतर बांधावा लागणार आहे. त्यामुळे एमएसआरडीसी जरी आॅगस्टअखेरपर्यंत सर्व कामे करण्याचा दावा करीत असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत पुलाखालील कामे सुरू राहतील, अशी शक्यता आहे.