शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

बोरणा मध्यम प्रकल्पाचा सांडवा झाला खिळखिळा

By admin | Updated: July 2, 2014 00:18 IST

मांडवा: परळी तालुक्यातील मांडव्याजवळील कासारवाडी येथील बोरणा नदीवर उभारण्यात आलेला सांडवा खिळखिळा झाला आहे.

मांडवा: परळी तालुक्यातील मांडव्याजवळील कासारवाडी येथील बोरणा नदीवर उभारण्यात आलेला सांडवा खिळखिळा झाला आहे. या सांडवा फुटला तर परिसरातील सुमारे १० हजारावर नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १९७३ मध्ये बोरणा नदीवर सांडवा बांधण्यात आला. ४१ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप या सांडव्याची साधी डागडुजी करायलाही प्रशासनाला वेळ मिळाला नाही. प्रकल्प उभारणी करताना निर्माण केलेला सांडवा आजही त्याच अवस्थेमध्ये तग धरुन आहे. या सांडव्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून, जास्त पाऊस झाल्यावर हा सांडवा फुटण्याची दाट शक्यता परिसरातील नागरिकांमधून वर्तविली जात आहे. सांडव्याच्या भिंतीला लावण्यात आलेले दगट गळून पडले आहेत तर सांडव्याला ठिकठिकाणी भेगा व मोठमोठे छिद्र पडले असून, यातून पाणी झिरपत आहे. त्यामुळे धरणाच्या पायथ्याला असलेल्या कासारवाडी, लोकरवाडी, उखळी आदी गावांमधील सुमारे १० हजार लोकांच्या जीवितास धोका पोहचण्याची शक्यता आहे. १९७२ मध्ये झालेल्या भीषण दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने मांडवा गावाजवळून वाहणाऱ्या बोरणा नदीवर प्रकल्पाची उभारणी केली. त्यामुळे मांडवा, मरळवाडी, मिरवट, कासारवाडी, लोकरवाडी, उखळी, नंदनज, सारडगाव आदी गावांच्या शिवारामधील कालवा डावा व उजवा लिफ्ट सिंचनाद्वारे १३७६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याने परिसरातील जमिनी हिरव्या झाल्या. या धरणाची लवकर दुरुस्ती न केल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा कासारवाडीचे माजी उपसरपंच धनंजय गुट्टे यांनी दिला. तर उपविभागीय अभियंता टी.जे.फारुखी म्हणाले, ६५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, मंजुरी मिळताच काम सुरू करू. (वार्ताहर)