शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी होण्याअगोदरच बोगसगिरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:03 IST

औरंगाबाद : तलाठी पदाच्या परीक्षेत स्वत:च्या नावावर दुसऱ्या उमेदवाराला बसविणाऱ्या जिल्ह्यातील तीन जणांविरुद्ध हर्सूल ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात ...

औरंगाबाद : तलाठी पदाच्या परीक्षेत स्वत:च्या नावावर दुसऱ्या उमेदवाराला बसविणाऱ्या जिल्ह्यातील तीन जणांविरुद्ध हर्सूल ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले की, समाधान सीताराम भोतकर (२७, रा. हट्टी, ता. सिल्लोड), अंबादास विठ्ठल साबळे (२८, रा. गणेशनगर, सिडको महानगर, वडगाव कोल्हाटी) आणि खुशालसिंग फुलसिंग ठाकूर (३७, रा. संजरपूरवाडी, परसोडा, ता. वैजापूर), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अहमदनगर उपविभागीय महसूल मंडळातील तलाठ्याच्या ८४ रिक्त पदांसाठी एका खाजगी त्रयस्थ संस्थेने ही परीक्षा घेतली होती. महापरीक्षा पोर्टलद्वारे २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. ही परीक्षा हर्सूल परिसरातील औताडे कॉम्पलेक्सनजीक असलेल्या ड्रीम लॅण्ड इंग्लिश शाळेत ३ ते ७ जानेवारी २०२० या काळात पार पडली होती. ही परीक्षा पार पडत असताना सीताराम भोतकर, अंबादास साबळे आणि खुशालसिंग ठाकूर यांनी स्वत: परीक्षा देण्याऐवजी त्यांच्या नावावर दुसरे बोगस उमेदवार परीक्षेला बसविले.

परीक्षा झाल्यानंतर या तिघांसह ११ उमेदवारांचे पोर्टलवर अर्जातील फोटो, स्वाक्षरी आणि प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या फोटो, स्वाक्षरीत तफावत आढळून आली. त्यानुसार ३ एप्रिल रोजी अहमदनगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात तहसीलदार (महसूल) माधुरी आंधळे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यापैकी तीन उमेदवारांनी हर्सूल भागातील शाळेतून परीक्षा दिल्यामुळे त्यांच्याविरुद्धचा गुन्हा हर्सूल ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सचिन इंगोले करीत आहेत.