आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील गजानन गंगाधर बटवार (वय १४) या पुरात वाहून गेलेल्या बालकाचा सोमवारी दुपारी गोकुळ येथील नदीपात्रात मृतदेह आढळून आला. गजानन हा सिल्लोड येथील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होता. रविवारी सुटी असल्याने तो शनिवारी दुपारनंतर आव्हाना येथे आला. परंतु दुपारी शेतात जाऊन तो हातपाय धुण्यास गेला असता केळणा नदीला पूूर आल्याने तो पुरात वाहून गेला. गजानन घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांसह पोलिसांनी व ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. ४८ तासांच्या शोधानंतर गोकुळ येथील नदीपात्रात गजाननचा मृतदेह पोलिसांना सापडला. घटनास्थळी सहाय्यक उपनिरीक्षक कुरेवाड, मंडळ अधिकारी एस.टी. गारोळे, तलाठी ए.एस. वीर आदींनी पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने मुलाच्या कुटुंबियांची भेट घेतली.
पुरात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आढळला
By admin | Updated: September 17, 2014 01:11 IST