शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या घंटागाड्या झाल्या गायब?

By admin | Updated: June 2, 2014 00:53 IST

जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच घंटागाड्याही गायब झाल्या असल्याने शहरातील विविध भागांना कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजा-वाजा करीत घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. नवीन जालना भागातील स्वच्छतेचे कंत्राट खाजगी एजन्सीला देण्यात आले. सोसायटीला बहाल केलेल्या कामाची मुदत संपली आहे. नवीन जालना भागातील फुलबाजार, कपडाबाजार, फुले मार्केट, सिंधीबाजार, सराफा रोड, टांगा स्टॅण्ड-मामा चौक या भागात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घंटागाडी धावणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत पालिकेच्या घंटागाड्या फिरकल्या नाहीत. दरम्यान, दोन आठवड्यात संपूर्ण नवीन जालना स्वच्छ व सुंदर होईल, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र ते सर्वांच्या विस्मृतीत गेले. कधीकधी जुना जालना भागात घंटागाड्या येत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गाड्या येत नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. या भागात सफाई कर्मचारी वळविण्यात आले होते. मात्र, तेही नियमितपणे सफाई करीत नाहीत, अशी ओरड होत आहे. मान्सूनपूर्व कामे हाती घेत पालिकेने या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र, नाल्यांमधील घाण रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते अडचणीचे ठरत आहेत. नागरिकांनी आपल्या घरातील केर-कचरा टाकावा तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाड्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागात फिरकलेल्याच नाहीत, असे विदारक चित्र आहे. त्यामुळे शहराची अवस्था कचराकुंडीसारखीच झाली आहे. दरम्यान, पालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून शहरातील प्रतिष्ठित आणि सुजाण नागरिकांनीच स्वच्छतेविषयी पुढाकार घेतला. ‘सिटीजन्स फॉर सिटीजन’ या संस्थेने रविवारी रॅली काढून नागरिकांनीच आप-आपल्या घरातील कचर्‍याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) सफाईची मागणी पालिकेने मान्सूनपूर्व सफाईची कामे हाती घेतली आहेत. यात नाल्यांची सफाई होतांना दिसत आहे. मात्र, शहरातील कचराकुंड्यांवरील घाण साफ करावी, जेणे करून पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही, अशी मागणी होत आहे.