वाळूज महानगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बजाजनगरात रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात ८५ जणांनी रक्तदान केले.
येथील विठ्ठल मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिरात रक्त संकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केले. शिबिराला विठ्ठल मंदिर ट्रस्टचे डी. एम. घुगे, महावीर धुमाळे, प्रशांत पांडव, बाबासाहेब सोमवंशी, प्रीतम जाजू, प्रसाद जोशी, मिलिंद जाधव, कृष्णा कुलकर्णी, ऋषभ खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ-
बजाजनगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित शिबिरात रक्तदान करताना रक्तदाते व पदाधिकारी दिसत आहेत.
वाळूजला आठवडी बाजारात विक्रेत्याविरुध्द कारवाई
वाळूज महानगर : वाळूजला सोमवारी आठवडी बाजारात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ७ भाजी विक्रेत्यांवर ग्रामपंचायत व पोलिसांतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोमवारी आठवडी बाजारात काही शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, सरपंच सईदाबी पठाण, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रेत्यांविरुध्द कारवाई करण्यात आली.
सिडको महानगरातून महिला बेपत्ता
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातून एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. शिल्पा विठ्ठल साळवे (३०, रा. सिडको वाळूज महानगर) ही महिला ३० एप्रिल रोजी रात्री पती विठ्ठल साळवे कंपनीत कामाला निघून गेल्यानंतर, दोन मुलांना घरात सोडून बेपत्ता झाली आहे.