शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद लोकसभेसाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:02 IST

भाजपला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीनिशी ताब्यात घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा, असे पक्षाचे निरीक्षक महेंद्रसिंग यांनी पक्षक़ार्यकर्त्यांच्या बैठकीत गुरुवारी स्पष्टच करुन टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीनिशी ताब्यात घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा, असे पक्षाचे निरीक्षक महेंद्रसिंग यांनी पक्षक़ार्यकर्त्यांच्या बैठकीत गुरुवारी स्पष्टच करुन टाकले. मतदारसंघाचा पूर्ण लेखाजोखा पक्षाकडे आहे. आजची बैठक प्रातिनिधिक होती; परंतु पुढच्या १५ दिवसांनंतर होणारी बैठक चक्रव्यूह रचनेसारखी असणार आहे, असेही ते म्हणाले.मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत महेंद्रसिंग चाचपणी करून त्याचा अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देणार आहेत. त्यांनी पूर्ण मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर औरंगाबादेत शेवटची बैठक घेतली. शिवसेनेसोबत युती होणार नाही, असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत जोरदार चर्चा आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून तो शिवसेनेचा गड मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवार देण्याची तयारी सुरु केल्याचे या बैठकीतून स्पष्टपणे समोर आले.दरम्यान गुरुवारी झालेल्या पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीवर महेंद्रसिंग समाधानी नसल्याचे भाजप गोटातून समजले. मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी सेनेकडे तर हिंगोली, नांदेडचे काँग्रेस खासदार आहेत. जालना, लातूर, बीड भाजपकडे आहे.महेंद्रसिंग यांनी पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकाºयांची चांगलीच परीक्षा घेतली. मतदारसंघ क्रमांकापासून तर बुथ बांधणीपर्यंतची सर्व जंत्री त्यांच्याकडे असल्यामुळे विद्यमान खासदार, आमदारांची त्यांनी केलेल्या प्रश्नांमुळे तारांबळ उडाली. पं.दीनदयाल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मतिथी, जालना व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक किती, असे प्रश्न त्यांनी केले. त्याची उत्तरे उपस्थिताना देता आली नाहीत.बैठकीला खा. रावसाहेब दानवे यांना उशीर झाला. तत्पूर्वीच बैठक सुरू झाली होती. यावेळी औरंगाबादचे प्रभारी खा. अमर साबळे, आ. अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, आ. प्रशांत बंब, उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड, जिल्हाप्रमुख एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची उपस्थिती होती.