शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतील परतफेडीसाठी भाजपची आघाडीला साथ

By admin | Updated: November 4, 2016 00:13 IST

बीड : माजलगाव नगरपालिकेमध्ये भाजपने सहाल चाऊस यांना मदतीचा हात दिला आहे.

बीड : माजलगाव नगरपालिकेमध्ये भाजपने आपला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार न देता विधानसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत केलेल्या सहाल चाऊस यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून मदतीचा हात दिला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाल चाऊस हे न. प. निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजलगाव नगर पालिका निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येत आहे. माजलगावमध्ये भाजपला उमेदवार मिळाला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असली तरी खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सहाल चाऊस यांनी उघडपणे भाजपचे आमदार आर. टी. देशमुख यांचा प्रचार केला. याची आठवण म्हणून भाजपने माजलगाव नगरपालिकेत आघाडी केलेल्या सहाल चाऊस यांना मदतीचा हात दिले आहे. केवळ १० उमेदवारांनाच एबी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या घडामोडीमुळे माजलगावचे राजकीय समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. आघाडीमुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. शिवसेनेबरोबरची युती तोडत भाजपने हा धाडसी निर्णय घेतला आहे.एकंदरीत या साऱ्या पडझडीला राकाँचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा नितीन नाईकनवरे या कशा सामोरे जातात हे पाहण्यासाठी वेळ जावा लागणार आहे.यातच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेल्या शेख मंजूर यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारकत घेऊन मोहन जगताप हे देखील आघाडीच्या सोबत असल्याचे चित्र माजलगावमध्ये आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर राजकीय समीकरणे बदलली आहेत. (प्रतिनिधी)