औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहरातील मंडळस्तरावर कार्यकर्त्यांचे बौद्धिक वर्ग घेतले. ७०० हून अधिक कार्यकर्त्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षित केले गेले. पक्षाने चार ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेतले. सरचिटणीस समीर राजूरकर यांनी शहर जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे संयोजन केले होते. सरचिटणीस राजू शिंदे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, हर्षवर्धन कराड, राजेश मेहता, महेश मावळतकर, सागर पाले, अरुण पालवे, सिद्धार्थ साळवे, अजय शिंदे, प्रवीण कुलकर्णी, दीपक बनकर, लक्ष्मीकांत थेटे हे मंडळनिहाय संयोजक होते. भाजपाचा इतिहास आणि विकास, विचार परिवार, आत्मनिर्भरता व राष्ट्रीय सुरक्षा, मुख्य प्रवाह हीच विचारधारा, व्यक्तिमत्त्व विकास, सहा वर्षांतील अंत्योदय कार्य, भाजप व आपले कर्तव्य, सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग, पक्ष कार्यपद्धती आणि संघटनेतील आपली भूमिका या विषयांवर आ. हरिभाऊ बागडे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, शिरीष बोराळकर, मनोज पांगारकर, किशोर शितोळे, संजय गायकवाड, माधुरी अदवंत यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी पाच विषयांवर तर दुसऱ्या दिवशी चार विषयांवर बौद्धिक वर्ग घेतले.
मंडळस्तरावर भाजपाने घेतले बौद्धिक वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST