शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज चर्चचे संस्थापक बिशप वाय़ एम़दुप्ते यांचे निधन

By admin | Updated: December 25, 2016 23:46 IST

लातूर : गुड न्यूज चर्चचे संस्थापक बिशप वाय़एम़ दुप्ते यांचे रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराने निधन झाले़

लातूर : गुड न्यूज चर्चचे संस्थापक बिशप वाय़एम़ दुप्ते यांचे रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराने निधन झाले़ मृत्यू समयी त्यांचे वय ७१ वर्षांचे होते़ महाराष्ट्रातील ३५ गुड न्यूज चर्चची स्थापना बिशेप वाय़एम़ दुप्ते यांनी केली असून गेल्या ४० वर्षांपासून ते धर्मकार्यात होते़ अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली़ नाताळाच्या सणादिवशी त्यांचे निधन झाल्याने लातूर जिल्ह्यातील नाताळचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले़बिशेप वाय़एम़ दुप्ते गेल्या काही दिवसांपासून त्यांना हृदयाचा त्रास होता़ त्यांच्यावर लातुरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते़ दरवर्षी लातूर शहर व जिल्ह्यात ख्रिसमस जन्मोत्सवाचा उत्साह असतो़ यंदा ते आजारी असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले नव्हते़रविवारी शहरातील सर्व चर्चमध्ये केवळ प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते़ मात्र रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बिशेप वाय़एम़ दुप्ते यांचे निधन झाल्याची वार्ता पसरताच सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले़ मळवटी रोड येथील गुड न्यूज चर्च येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे़ बिशेप वाय़एम़ दुप्ते यांच्या पार्थिवावर आर्वी येथील ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीत सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे़ नगरसेवक डॉ़ प्रभुदास गुप्ते यांचे बंधू, रेव्ह बेंजामीन दुप्ते यांचे ते वडिल होत़