शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेचा मोठा फौजफाटा

By admin | Updated: December 27, 2016 00:12 IST

जालना : शहरातील १७ अनधिकृत धार्मिकस्थळांचे अतिक्रमण मंगळवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात येणार आहे.

जालना : शहरातील १७ अनधिकृत धार्मिकस्थळांचे अतिक्रमण मंगळवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने दीडशे कर्मचाऱ्यांसह दीडशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात १७ धार्मिकस्थळे अनधिकृत आहेत. याचे सर्व्हेक्षण पालिकेने केले असून, संबंधितांना ते काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक धार्मिक स्थळांनी अतिक्रमण न काढल्याने मंगळवारी सकाळी हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. यासाठी नगर पालिकेने पूर्ण तयारी केली आहे. अतिक्रमण पथकांसह विविध पथकांची स्थापना करण्यात आल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. अतिक्रमण हटविण्यासाठी नगर पालिकेचे स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग तसेच अन्य विभागातील मिळून सुमारे दीडशे कर्मचारी मोहिमेत सहभागी होणार आहे. यासाठी ४ ट्रॅक्टर्स व दोन जेसीबी वापरण्यात येणार आहेत. काही धार्मिक स्थळांच्या विश्वस्त स्वत:हून अतिक्रमण काढून घेणार असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. लोकभावना लक्षात घेता संबंधितांना पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नवीन व जुना जालन्यात मिळून धार्मिक स्थळांचे अतिक्रमण आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. काही अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी तसेच अन्य पोलिस निरीक्षकांचा बंदोबस्त या कारवाई दरम्यान असणार आहे. धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांनी स्वत:हून अतिक्रमण काढल्यास मोठी मदत होईल, सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)