जालना : जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रूक घटनेच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी विविध पक्ष व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोठा मोर्चा काढला. येथील नूतन वसाहत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वरूड प्रकरणी कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधितांचा बंदोबस्त करावा, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. यात गंगाधर गाढे, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, सुधाकरराव निकाळजे, अॅड. बी.एम. साळवे, सुधाकर रत्नपारखे, अॅड. शिवाजी आदमाने, विलास डोळसे, राजेंद्र हिवाळे, गणेशराव रत्नपारखे, बबनराव रत्नपारखे, एन.डी. गायकवाड, सुनील साळवे, संजय म्हस्के, मिलींद सोनवणे, आप्पासाहेब कदम, वामन दांडगे, गौतम म्हस्के, चंद्रकांत चौथमल, रमेश गायकवाड, कौतिकराव राऊत, विश्वास नरवडे, शिवाजी भिसे, पी.आर. भिसे, निवृत्ती बनसोडे, प्रकाश राऊत, मिलींद पारवे, प्रकाश मगरे, अतुल जाधव, दिलीप खरात, सुनील रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, मधुकर गायकवाड, संदीप खरात, कपिल खरात, बाळा खरसान, अय्युब पठाण, राजेश रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूीवर नूतन वसाहत, अंबड चौफुली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.तालुका जालना, कदीम जालना तसेच पोलिस मुख्यालयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
वरूड प्रकरणी जालन्यात मोठा मोर्चा
By admin | Updated: July 29, 2014 01:10 IST