शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भूम कृउबाचे सचिव लाचप्रकरणी जेरबंद

By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST

भूम : थकित पगार बील काढण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील कृषीउत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रविण मच्छिंद्र देवरे यांना रंगेहात जेरबंद करण्यात आले़

भूम : थकित पगार बील काढण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील कृषीउत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रविण मच्छिंद्र देवरे यांना रंगेहात जेरबंद करण्यात आले़ लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरूवारी सायंकाळी ही कारवाई केली असून, या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे़पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १९९७ पासून रखवालदार म्हणून काम इसमास सन २००० पर्यंत वेळेवर पगार देण्यात आला़ त्यानंतर रखवालदारास आॅक्टोबर २००० ते आॅक्टोबर २००७ पर्यंत पगार न देता व्हाऊचर, चेक किंवा रोख रक्कम देण्यात आली़ या कालावधीत उपदान व अंशदान संयुक्त खात्यामध्ये रकमेचा भरणा केला नाही़ रखवालदाराने पगार मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ त्यानंतर रखवालदारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रविण देवरे यांना भेटून पगार काढण्याची मागणी केली़ त्यावेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून पगार काढून देतो, पण त्यासाठी खर्च करण्याची तयारी ठेवा़ इतक्या दिवसांचा पगार काढायचा म्हणून तुम्ही २५ हजार रूपये द्या अशी मागणी करण्यात आली़ त्यानंतर रखवालदाराने १० हजार रूपये देवरे यांना दिले़ मात्र, देवरे यांनी उर्वरित १५ हजार रूपये दिल्याशिवाय थकीत पगार काढणार नाही, असे सांगितल्याची तक्रार रखवालदाराने उस्मानाबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती़ या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी भूम येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात सापळा रचला़ देवरे यांनी रखवालदारास त्याच्या कामासाठी लाचेची मागणी करून १५ हजार रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ दरम्यान, सदरील प्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास उपाधीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत़ (वार्ताहर)