संजय तिपाले , बीडउपचाराच्या बहाण्याने (टेंभुर्णी ता. शिरुर) येथे शिक्षकाच्या मतिमंद मुलीशी कुकर्म करणाऱ्या भोंदूबाबाने अखेर शनिवारी तोंड उघडले. सावपणाचा आव आणत ‘तो’ तर उपचाराचाच भाग होता, असा धक्कादायक खुलासा त्याने पोलिसांकडे केला आहे. देवीचे गाणे म्हणण्याचा त्याला छंद असून मैफिलीत तो महिलांची गर्दी जमवायचा, अशी माहितीही समोर आली आहे.दिलीप वामनराव रोकडे असे त्याचे नाव; परंतु रोकडे बाबा नावाने तो परिसरात ओळखला जायचा. पांढरे शर्ट व पांढरी पँट असा त्याचा पेहराव. अंगठेबहाद्दर असलेल्या या भोंदूचे वय ५५ वर्षे आहे. त्याला तीन एकर शेती असून ती डोंगरात असल्याने पिकत नाही, त्यामुळे वाट्याने दिलेली आहे. त्याला तीन विवाहित मुले असून ते ऊसतोडीसाठी बाहेरगावी आहेत. दोन नातवंडे व पत्नीसोबत तो गावालगतच्या शेतातील डोंगराजवळ झोपडीवजा घरात राहतो.देवीचे गाणे म्हणण्यात त्याचा हातखंडा आहे. परिसरातील विविध गावांत त्याला गाणे म्हणण्यासाठी निमंत्रणे असत. अंगात येणाऱ्या महिलांच्या अंगावर तो लिंबू कापून फेकायचा. गाण्याच्या कार्यक्रमाला महिलांचीच मोठी गर्दी असायची. त्यानंतर तो दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करू लागला. आजारी, दु:खी लोकांना संकटातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने त्याने अंधश्रद्धेचा बाजार भरविला होता. शिक्षक कुटुंबही त्याचे शिकार ठरले.
भोंदूबाबा म्हणतो, ‘तो’ तर उपचाराचाच भाग !
By admin | Updated: March 27, 2016 00:02 IST