शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टॅंकरची दुचाकीला उडविले, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:05 IST

वैजापूर/लोणी खुर्द : भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर ...

वैजापूर/लोणी खुर्द : भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शिऊर-नांदगाव रस्त्यावरील दस्कुली शिवारात बुधवारी सायंकाळी घडला. काकासाहेब तुकाराम मगर (४५) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोपट हरी कर्डीले (५०) हे यात गंभीर झाले आहेत. मयत व जखमी दोघेही तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी आहेत.

काकासाहेब मगर व कर्डीले हे दुचाकीवरून (क्र. एम. एच. २० डी. एम १२६३) शिऊर बंगला येथून नांदगाव रस्त्याने तलवाडा गावाकडे जात होते. त्यावेळी मनमाडकडून पैठणकडे जाणाऱ्या टँकरने (क्र. एम.एच २० ईएल २२९९) दस्कुली शिवारात त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात काकासाहेब मगर यांचा जागीच मृत्यू झाला. पोपट कर्डीले हे गंभीर जखमी झाले. टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके, फौजदार नागटिळक, कर्मचारी आर. आर. जाधव, अविनाश कोमटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कर्डीले यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर काकासाहेब मगर यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.

-----

अपघातग्रस्त दुचाकी,

090621\img-20210609-wa0216.jpg

टँकरच्या धडकेत एक ठार