शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबाद-खिर्डी रस्त्यावर भगदाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:04 IST

खुलताबाद : खुलताबाद ते खिर्डी रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली असून पावसाळ्यात हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. मागील सहा ...

खुलताबाद : खुलताबाद ते खिर्डी रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली असून पावसाळ्यात हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. मागील सहा वर्षांपासून या जीवघेण्या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. तरी देखील प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

खुलताबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या खिर्डी गावचा रस्ता खडतर बनलेला आहे. जागोजागी मोठी भगदाडे पडली आहेत. वाहनधारकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी चार कि.मी. अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना तब्बल अर्धा तास घालवावा लागतो. त्यामुळे वाहनधारकांकडून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

खिर्डी येथील बहुतांश शेतकरी हे भाजीपाल्याचे उत्पादन करतात. खुलताबाद, वेरूळ येथील आठवडी बाजारात ते भाजीपाला विक्री करण्यासाठी येतात. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळ‌े नागरिक त्रस्त बनले आहेत. बारा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम झाले होते. हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून खिर्डी, सालुखेडा या गावातील लोकांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत.

-

फोटो :

खुलताबाद ते खिर्डी हा चार कि.मी. रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.