शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद पहिल्यांदाच बीड जिल्ह्याकडे!

By admin | Updated: December 22, 2014 23:34 IST

संजय तिपाले , बीड विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मान स्व़ गोपीनाथराव मुंडे यांना मिळाला होता; परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद आतापर्यंत एकदाही बीडला मिळाले नव्हते़

संजय तिपाले , बीडविधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मान स्व़ गोपीनाथराव मुंडे यांना मिळाला होता; परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद आतापर्यंत एकदाही बीडला मिळाले नव्हते़ आ़ धनंजय मुंडे यांच्या रुपाने सोमवारी इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची सूत्रे बीडकडे आली आहेत़ ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांना शह देण्यासाठीच राष्ट्रवादीने धनंजय यांना पुढे केल्याची चर्चा राजकीय वर्र्र्तुळात आहे़राज्याच्या अन् देशाच्या राजकारणात प्रभाव राखणाऱ्या बीडने ग्रामविकास मंत्रीपदासोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद खेचून रुबाब कायम राखला आहे़ १९९१ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा सांभाळली होती़ तेंव्हा ५२ आमदारांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता़ तर ४२ आमदारांसह भाजपा तिसऱ्या स्थानी होता़ सुरुवातीला मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते़ मात्र, शिवसेनेत फूट पडली़ छगन भुजबळांनी बंडाचे निशाण झळकावल्यानंतर शिवसेनेचे संख्याबळ घटले अन् विधानसभेत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला़ त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आले होते़ दरम्यान, गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना कॅबिनेटमध्ये ग्रामविकाससारखे महत्त्वाचे खाते देऊन सन्मान राखलेला आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आ़ धनंजय मुंडे यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपवली. उल्लेखनीय म्हणजे बीडला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कधीच मिळालेले नव्हते.४गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा विरुद्ध धनंजय अशी बहीण भावाची ‘स्ट्रेट फाईट’ परळीत रंगली होती़ या निवडणुकीत धनंजय यांना पराभव पहावा लागला होता़ मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडल्यानंतरही राष्ट्रवादीने त्यांची विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लावली़ त्यामुळे धनंजय हे युद्धात हरले असले तरी तहात मात्र त्यांनी बाजी मारली आहे़