शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा- कलावंतांचा बालेकिल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:18 IST

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड व कै. किसनराव राऊत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता महाकरंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी थाटात झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्ह्यात कलावंतांची खाण आहे. राज्यातच नव्हे तर देशात बीडच्या कलाकारांनी झेंडा फडकावला आहे. कलावंतांचा बालेकिल्ला अशी बीड जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. ही गोष्ट बीडकरांसाठी अभिमानाची आहे, असे प्रतिपादन आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड व कै. किसनराव राऊत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता महाकरंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी थाटात झाले. यावेळी आ. क्षीरसागर बोलत होते.व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आयोजक अ‍ॅड. सुभाष राऊत, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, सुरेखा कुडची, नम्रता संभेराव, भरत लोळगे, राजाभाऊ शेळके, गोपाळ लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुभाष राऊत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी मागील सात वर्षांपासून या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेतून दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने बीडकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांना करिअरच्या दिशेने जाण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा कलावंतांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे अ‍ॅड. राऊत म्हणाले.मेघराज राजेभोसले म्हणाले, समता महाकरंडक ही स्पर्धा कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धांचे आयोजक होणे गरजेचे आहे. उपस्थित इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करून एकांकिका सादर करणाºया स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजक, संयोजक, मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.