शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणच्या बैठकीला बीडीओंची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:13 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बैठकीला १६ पैकी १४ तालुक्यांतील बीडीओंनी दांडी मारल्यामुळे समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी नाराजी दर्शवित गैरहजर असलेल्या बीडीओंचा खुलासा मागविण्यात यावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बैठकीला १६ पैकी १४ तालुक्यांतील बीडीओंनी दांडी मारल्यामुळे समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी नाराजी दर्शवित गैरहजर असलेल्या बीडीओंचा खुलासा मागविण्यात यावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या़जि़ प़ समाजकल्याण सभापती शीला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ दलित वस्तीच्या सुधारित आराखड्यासंदर्भात १६ तालुक्यांतील गटविकास अधिकाºयांना सभेला हजर राहण्याचे कळविण्यात आले होते़ परंतु या सभेला धर्माबाद व लोहा तालुक्यातील गटविकास अधिकाºयांचीच उपस्थिती होती़ त्यामुळे दलित वस्तीच्या आराखड्याचा विषय प्रलंबित ठेवावा लागला़त्यामुळे सभापती निखाते यांनी संबंधित अधिकाºयांच्या गैरहजरीमुळे नाराजी दर्शवली़ महत्त्वाच्या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीचे कोणतेही गांभिर्य अधिकाºयांना नसल्यामुळे विषयपत्रिकेतील कामे कधी मार्गी लागणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़ सभेला गैरहजर असलेल्या १४ गटविकास अधिकाºयांचे खुलासे मागविण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देण्यात आले आहे़दरम्यान, जि. प. च्या दलित वस्तीच्या २२ कोटींच्या कामांचे हे प्रकरण थंडबसत्यात अडकल्याने गत तीन- चार महिन्यांत कोणताच निर्णय झाला नाही़ त्यामुळे नवीन जि़प़ सदस्य संभ्रमात होते़ दलित वस्तीतील सिमेंट रस्ते, नाली, पाणी पुरवठ्याचे कामे, सौरदिवे, समाजमंदिर आदी कामे प्रस्तावित आहेत़ जि़ प़ समाजकल्याण सभापती निखाते यांनी समिती सदस्यांच्या संमतीने नवीन प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानंतर विभागीय आयुक्तांनीही त्यास अनुकूलता दर्शविली होती़, परंतु नुकताच राज्य शासनाने या निर्णयाला ब्रेक लावला होता़ त्यामुळे सदस्यांचा हिरमोड झाला़ परंतु २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या दलितवस्ती आराखड्यास डिसेंबरमध्ये मंजुरी मिळणार आहे़त्यासाठी पहिल्या वर्षात ४० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे़ ग्रामपंचायत स्तरावर दलित वस्तीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत़