शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

गंगापुरात काट्याची लढत अटळ

By admin | Updated: June 20, 2014 01:10 IST

लालखाँ पठाण, गंगापूर गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

लालखाँ पठाण, गंगापूरगंगापूर-खुलताबाद मतदारसंघाची निवडणूक रंगतदार ठरणार असून, खरी लढत काँग्रेस आघाडी, शिवसेना व विद्यमान अपक्ष आमदार प्रशांत बंब यांच्यात होणार असली तरी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मतदारसंघ पिंजण्यास सुरुवात केली आहे. आ. बंब यांच्यावरील नाराजीचा फायदा कोण उचलणार हे तिकीट वाटपानंतर कळेल पण काट्याची लढत मात्र अटळ आहे.मागील निवडणुकीत शिवसेनेचे अण्णासाहेब माने यांचा प्रशांत बंब (अपक्ष) यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुंडलिकराव माने चौथ्या क्रमांकावर होते.अण्णासाहेब माने दोन वेळा निवडून गेले. मागच्या तिसऱ्या निवडणुकीत मात्र अपक्ष प्रशांत बंब यांनी ‘चला लढू या, बदल घडवू या’ असा नारा देत सर्व मातब्बरांना आस्मान दाखवले. यावेळी ‘चला लढू या, बदल घडवू या’ असा नारा चालणार नाही. आ. बंब वेगळी चाल खेळतील. मागील वेळेला त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते. आता दोन्ही तालुक्यांत त्यांनी कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. परंतु गेली पाच वर्षे ‘चला लढू या, बदल घडवू या’ हा त्यांचा नारा पोकळ ठरला. कुठलाही बदल ते घडवू शकले नाहीत. त्यामुळे यंदाची निवडणूक बंब यांना सोपी नाही. काँग्रेसमध्येदेखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. खुलताबादचे जगन्नाथ खोसरे, गंगापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजय जाधव, डोणगाव येथील जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून, राष्ट्रवादीमध्ये विधानसभा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, तालुकाध्यक्ष हरिभाऊ डव्हाण, खुलताबादचे तालुकाध्यक्ष राजू वरकड, विलासराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.गंगापूर-खुलताबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर कृष्णा पाटील डोणगावकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.मनसेचे जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव, बादशाह पटेल, जि.प. सदस्य शैलेश क्षीरसागर, दिलीप बनकर तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सर्जेराव चव्हाण, भाजपाचे किशोर धनायत यांची नावेही चर्चेत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत घडले तसेच घडेल या आशेने शिवसेनेत आतापासूनच रस्सीखेच सुरू आहे. अण्णासाहेब माने, अंबादास दानवे, दिनेश मुथा, मनोज जैस्वाल, अरुण रोडगे, खुलताबादचे कारभारी जाधव, युवा सेनेचे संतोष माने उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. गंगापूरचे तालुका प्रमुख प्रकाश डुबेदेखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे तालुक्यात हक्काचे २५ ते ३० हजार मतदान आहे. पण सत्ता नसल्यामुळे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेपासून दूर गेले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे लासूर बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील डोणगावकर वर्षभरापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.वडील माजी खा. दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांची पुण्याई, तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा, प्रत्यक्ष संपर्क व विविध माध्यमांतून केलेली सामाजिक कार्ये ही त्यांची जमेची बाजू. पण जागा कुणाला सुटते,यावर बरेच काही अवलंबून आहे.