कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाने खातेदाराची ३ लाख १९ हजार ३४४ रूपयांची रक्कम परस्पर दुसऱ्याच्या कर्ज खात्यात वर्ग करून खातेदाराची फसवणूक केली. दरम्यान, रक्कम परस्पर वर्ग केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने संबंधित खातेदाराच्या खात्यात ती रक्कम ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश बँकेला ७ आॅगस्ट रोजी दिले आहेत.कुंभार पिंपळगाव येथील व्यवसायिक गोंविद व्यंकटराव जायभाये यांचे बँक आॅफ महाराष्ट्र शाखा कुंभारपिंपळगाव येथे चालु खाते आहे. त्यांच्या खात्यातून बँकेने परस्पर १३ आॅगस्ट २०१४ रोजी १ लाख ९३ हजार ९७२ व त्यानंतर १लाख २५ हजार ३७२ रूपये व १८ आॅगस्ट २०१४ रोजी ५४ हजार ८५८ रूपये त्यांच्या संमतीशिवाय वडिलांच्या खात्यावर वळविण्यात आली.त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या नावावर वर्ग केलेले ५४ हजार ८५२ रूपये परत खातेदाराच्या खात्यात वर्ग केले. यात खातेदाराचे एकूण ३ लाख १९ हजार ३४४ एवढी रक्कम खातेदाराच्या खात्यातून परस्पर काढण्यात आली. त्यामुळे खातेदार गोविंद जायभाये यांनी या प्रकरणी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे ८ सप्टेंबर २०१४ रोजी बँकेकडून ती रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला होता.यावर तक्रारदाराची तक्रार, प्रतिपक्षाचा जबाब व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासावरून प्रतिपक्ष यांनी तक्रारदाराच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती करून सेवेत कमरता केल्याचा निकर्ष निघाला. (वार्ताहर)तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करून, तक्रारदाराच्या खात्यात ३ लाख १९ हजार ३४४ रूपये ३० दिवसात जमा करावे, १३ आॅगस्ट २०१४ पासून रक्कम प्रत्यक्ष वळती होईपर्यंतच्या कलावधीसाठी ९ टक्के व्याज दराने व्याज द्यावे, तसेच तक्रार खर्च म्हणून तक्रारदारास ५ हजार रूपये द्यावा, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचचे सुहास आळशी, रेखा कापडिया, निलीमा संत यांच्या त्रिसदस्य समितीने दिला आहे. तक्रारदाराच्या वतीने अॅड. आर. व्ही जाधव यांनी प्रतिपक्षाच्यावतीने अॅड. एम. बी. पाठक यांनी काम पाहिले.४ रक्कम परस्पर वर्ग केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने संबंधित खातेदाराच्या खात्यात ती रक्कम ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश बँकेला ७ आॅगस्ट रोजी दिले आहेत.
महाराष्ट्र बँकेला ग्राहक मंचचा दणका
By admin | Updated: August 10, 2015 00:56 IST