लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़ परंतु, आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार पाऊस जिल्ह्यतील इतर तालुक्यात झालेला नाही़ दिवसा ढगाळ वातावरण व रात्री पाऊस होण्याऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमनाकडे लागल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी, निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टर वर पेरणी झाली परंतु पुरेशा आद्रार नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार मोठा पाऊस जिल्ह्यातील इतर तालुक्यात झालेला नाही़दिवसा ढगाळा वातावरण व रात्री पाऊसा ऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमणाकडे लागल्या आहेत लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मूग ,उडीद, तूर, मका, साळ, भुईमूग, सूर्यफूल इ. पिकांचा समावेश आहे़ जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ५ लाख ९५ हजार हेक्टर कार्यक्षेत्र आहे़ जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे केली़ तसेच खता बियाणाचेही नियोजन केले मृग नक्षत्रात २० जुन रोजी लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकूर आदी तालुक्यात रिमझीम पाऊस झाला तर निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने झालेल्या पावसावर बळीराजांने काळ्या आईची ओटी भरली परंतू आर्द्रा नक्षत्र कोरडे जात असल्याने व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा नजरा आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ कृषी तज्ज्ञांच्या सल्यानुसार जूनअखेरपर्यत पाऊस पडला तरी शेतकऱ्यांचा पेरण्या वेळेवर होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही त्यांनी सांगितले़ मृग नक्षत्राच्या सुरूवातील १०:२६:२६़, डी़एपी, १८:१८:१०, १४:३५:१४, १२:३२:१६ यासह इतर खताचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली परंतू नंतरच्या कालावधीत वरूनराजाच्या लांबण्यामळे खतविक्रीची ७० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़ तर बियाणाच्या ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़परिणामी खते, बियाणेधारक व्यापाऱ्यासह बळीराजा चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे़१०० हेक्टरवर पेरणी़़़जिल्हाभरात ५ लाख ९५ हेक्टर टक्के खरिपाचे क्षेत्र असतांनाही अल्पशा पावसामुळे निलंगा, शिरूर अनंतपाळ,देवणी या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली परंतु उर्वरित रेणापूर, लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकुर या तालुक्यात मोठा पाऊस न पडल्यामुळे अध्यापही ५ लाख हेक्टर क्षेत्र अध्यापही उजाड असलेले दिसून येत आहे़ त्यामुळे पावसाच्या आगमनाची शेतकरी वाट पाहत आहेत़ खत व बियाणे विक्रीवर परिणाम़़़शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीनुसार पाऊस न पडल्यामुळे पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा आहे़तर पाऊस न पडल्यामुळे खते बियाणाच्या दुकानावर गर्दी नसल्यामुळे खताची ९० टक्के उलाढाल ठप्प आहे तर बियाणाची ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़मृग नक्षत्र संपला आद्रा सुरू झाले तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़उशीरा होणाऱ्या पावसामुळे सुयफुल, मका,तुर आदी पिकावर परिणाम होणार नाही पंरतू खरिपाच्या इतर पिकावर मात्र या पावसाचा परिणाम असून उशीरा पेरणी झालेल्या पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मोहन भिसे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले
बरसो रे मेघा़़़ बरसो रे़़़
By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST